आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी, मुलीचा शिरच्छेद, पत्नीचे शीर घेऊन पोहोचला सासरी:बिहारमध्ये निर्घृण हत्येनंतर पतीने काढला सेल्फी, चारित्र्यावर होता संशय

मधेपुरा (बिहार)6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारच्या मधेपुरामध्ये आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीने आपल्या पत्नी आणि मुलीची हत्या केल्याची घटना घडली. एवढेच नाही तर आरोपीने पत्नीचे छिन्नविछिन्न शीर घेऊन पत्नीचे माहेर गाठले आणि घरापासून 200 मीटर अंतरावर असलेल्या पुलावर शीर ठेवून फरार झाला. शिरासोबत त्याने एक चिठ्ठीही ठेवली. तर मधेपुरा येथील आरोपीच्या घरात पत्नी आणि मुलीचे मृतदेह पडले होते. त्याने मुलीचे शीर टेबलावर ठेवले होते. पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आरोपी हा गुन्हा केल्याचे सांगण्यात येत आहे.

पत्नीचे कापलेले डोके घेऊन आरोपी शनिवारी सकाळी आपल्या घरून निघाला (श्रीनगर पोलिस स्टेशन क्षेत्रातील पोखरिया गाव) आणि पत्नीचे आई-वडिल राहतात त्या गावी (सदर पोलीस स्टेशन परिसरातील गोधैला गाव) पोहोचला. पत्नीच्या आई-वडिलांच्या घरापासून 200 मीटर अलिकडे असलेल्या एका पुलावर त्याने तिचे कापलेले डोके ठेवले व पळून गेला. मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या लोकांनी हे डोके पाहिले आणि परिसरात एकच खळबळ उडाली. याठिकाणी माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि शीर घेऊन आरोपीच्या घरी पोहोचल्यानंतर घरातील दृश्य पाहून चक्रावून गेले. तेथे मुलीचा मृतदेहही आढळला.

रक्ताने माखलेली चिठ्ठी

पत्नी आणि मुलीची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला. मृतांची ओळख जिब्राहिलची पत्नी रुक्साना (30) आणि मुलगी जिया (4) अशी आहे. घटनास्थळावरून रक्ताने माखलेली एक चिठ्ठी सापडली. त्यात काही आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या असून अप्रतिम, जबरदस्त असे लिहिलेले आहे.

अवैध संबंधाच्या संशयावरुन हत्या

जिब्राहिल आणि रुक्साना यांचा 12 वर्षांपूर्वी विवाह झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. लग्नानंतर त्यांना 3 मुले झाली. दोन मुल ही त्यांच्या मामाच्या घरी शिक्षण घेण्यासाठी राहत होती. तर मुलगी जिब्राहिल आणि रुक्साना यांच्यासोबत राहत होती. लग्नानंतर पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरुन वारंवार वाद होत होते.

जिब्राहिल दुसऱ्या राज्यात शिवणकाम करायचा. शिवणकामाच्या येणाऱ्या कमाईतून घराचा उदारनिर्वाह चालायचा. या दरम्यान तो अधून-मधून घरी येत असे. गेल्या वर्षी घरी आल्यावर पुन्हा बाहेरगावी कामाला गेला नाही. स्थानिकांचे म्हणणे आहे की, जिब्राहिलला त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यावरुन अनेकदा वादही झाले. शुक्रवारी रात्री दोघांमध्ये वाद झाला असावा, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यानंतर त्याने पत्नीची निर्घृण हत्या केली.

सासरी जाण्याची इच्छा नव्हती
त्याचवेळी मृत रुक्सानाच्या भावाने सांगितले की, बाबुल राजाची का हत्या करण्या आली, याचे कारण अद्याप कळू शकले नाही. तर मृत महिलेचे वडील म्हणाले की, जिब्राहिल बदमाश व्यक्ती होता. तो सतत आपल्या मुलीवर अत्याचार करत असे. यामुळे मुलीला पतीसोबत सासरच्या घरी राहायचे नव्हते.

यामुळेच ती 15 दिवसांपूर्वी माहेरी आली होती. मात्र जेव्हा जिब्राहिल आपल्या गावातील वॉर्ड सदस्यासह आमच्या घरी आला आणि पुन्हा कोणताही अत्याचार करणार नाही अशी ग्वाही दिली. म्हणून मग आम्ही तिला त्याच्यासोबत पाठवले. रुक्सानाला जिब्राहिलसोबत पाठवल्याच्या दुसऱ्यादिवशी मी माझ्या धाकट्या मुलाला तिच्या घरी सगळी परिस्थिती ठिक आहे का, हे पाहण्यासाठी पाठवले होते. तेव्हा तिथे सर्व काही ठीक आहे असे वाटत होते. मात्र, आज सकाळी मुलगी व नातवाच्या हत्येची बातमी समोर आली.

या प्रकरणी मधेपुराचे एसपी राजेश कुमार यांनी सांगितले की, आई आणि मुलीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला आहे. घरगुती वादातून पतीनेच दोघांची हत्या केल्याचा संशय आहे. आरोपीचा शोध सुरू आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी काही लोकांची चौकशी केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...