आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘द केरला स्टोरी’ चित्रपट मध्य प्रदेशात करमुक्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करून याची माहिती दिली. ‘द केरला स्टोरी’ कथा हा केरळमधील महिलांच्या ग्रुप बद्दलचा चित्रपट आहे. हा ग्रुप इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) मध्ये सामील होतो. हा चित्रपट 5 मे रोजी म्हणजेच शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. CBFC ने रिलीजपूर्वी चित्रपटात 14 कट्स मागितले होते. त्याचा ट्रेलर 26 एप्रिल रोजी रिलीज झाला होता. 2 मिनिटे 45 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये 3 महाविद्यालयीन मुली दहशतवादी संघटनेत कशा प्रकारे सामील होतात हे दाखवण्यात आले आहे.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणाले की, ‘द केरला स्टोरी’ लव्ह जिहाद, धर्मांतरण आणि दहशतवादाच्या कटाचा पर्दाफाश करते आणि त्याचा घृणास्पद चेहरा समोर आणते. क्षणिक भावनेच्या भरात लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकणाऱ्या मुली कशा उद्ध्वस्त होतात हे या चित्रपटातून सांगण्यात आले आहे. या चित्रपटात दहशतवादाची रचनाही समोर येते. आई-वडील, मुले, मुली, सर्वांनी हा चित्रपट पाहावा.’
यापूर्वी 'द काश्मीर फाइल्स' केला होता करमुक्त
द काश्मीर फाइल्स हा चित्रपट मध्य प्रदेशात करमुक्त करण्यात आला होता. तेव्हा मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकांना चित्रपट पाहण्यास सांगितले होते. त्यांनी ट्विट केले होते की, ‘हा चित्रपट 90 च्या दशकातील काश्मिरी हिंदूंच्या वेदना, दुःख, संघर्ष, स्थलांतर आणि आघात यांची हृदयद्रावक कथांवर आधारीत आहे. जास्तीत जास्त लोकांनी तो पाहावा यासाठी चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’
तर दुसरीकडे ‘हा चित्रपट केवळ इतिहासातील कथा नव्हे तर त्यांच्या दुःखाचे उदाहरण आहे आणि काही वर्षांपूर्वीचा धडा आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जवळ दुसरे काश्मीर तर तयार होत नाही ना.’ असे भाजपचे राज्यमंत्री रजनीश अग्रवाल यांनी म्हटले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.