आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Madhya Pradesh By Election Jyotiraditya Scindia Forgot His Party Say Votes For Congress

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मध्य प्रदेश पोटनिवडणुका:...अन् आपला पक्षच विसरले ज्योतिरादित्य सिंधिया, भरसभेत मतदारांना केले पंज्यासमोरील बटन दाबण्याचे आवाहन; व्हिडिओ होतोय व्हायरल

भोपाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मध्य प्रदेश विधानसभेच्या 28 जागांवर येत्या रोजी पोटनिवडणूक होणार आहे.

मध्य प्रदेशमध्ये पोटनिवडणुका जाहिर झाल्या आहेत. याच्या प्रचारादरम्यान भाजपचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया हे भर सभेत आपला पक्षच विसरले. त्यांनी भरसभेत काँग्रेसची घोषणा देण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मध्य प्रदेश विधानसभेच्या 28 जागांवर येत्या रोजी पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी राजकीय मैदानात हालचाली सुरू आहेत. भरगच्च जाहीर सभांमध्ये आपल्याच पक्षाला समर्थन देण्यासाठी नेते मतदारांना आवाहन करत आहे. दरम्यान काँग्रेसला रामराम ठोकत भाजपच्या गोटात सामिल झालेले ज्योतिरादित्य शिंदे हेदेखील आपल्या पक्षासाठी जोर लावत आहे. पण, एका सभेमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया चक्क आपला पक्षच विसरले... त्यांनी चक्क काँग्रेससाठीच जनतेकडे मतांची याचना केली. यानंतर स्टेजवर उपस्थित नेते त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच मध्य प्रदेशच्या काँग्रेसनेही आपल्या ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. काँग्रेसने मिश्किल टिका करत म्हटले की, 'सिंधिया जी, मध्यप्रदेशची जनता विश्वास देते की, तीन तारखेला हाताच्या पंज्याचे बटनच दबेल'

दरम्यान सिंधिया यांच्या चूक लक्षात आली. यानंतर त्यांनी लगेचच सारवासारव केली. ते म्हणाले की, 'कमळाचे फूल असलेले बटन दाबणार आणि हाताचा पंजाच्या बटनाला बोरिया बिस्तर बांधून आम्ही इथून रवाना करणार'