आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मध्य प्रदेशच्या 19 जिल्ह्यांच्या 28 विधानसभा सीटवरील पोटनिवडणुकांमध्ये 76% मतांची गणना पूर्ण झाली आहे. 3 नोव्हेंबरला 28 जागांवर 44.57 लाख मते टाकण्यात आले होते. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 34.11 लाख मतांची गणना पूर्ण झाली. या मतांमधून 50 % वोट भाजपच्या खात्यात गेले आहेत. याची संख्या 17.49 लाख आहे.
आतापर्यंत 8 सीटचे निकाल आले आहेत. यामध्ये 7 वर भाजप आणि 1 वर काँग्रेसचा विजय झाला आहे. भाजपचे 5 मंत्री बदनावरमधून राजवर्धन सिंह दत्तीगाव, बमोरीमधून महेंद्र सिंह सिसौदिया, सांचीमधून प्रभुराम चौधरी, ग्वालियरमधून प्रद्यु्म्न सिंह तोमर आणि सुवासरामधून हरदीप सिंह डंग विजयी झाले आहेत. भांडेरमधून भाजपच्या रक्षा संत राम सिरोनिया यांनी केवळ 136 मतांनी काँग्रेसच्या फूल सिंह बरैया यांना हरवले आहे. तर मांधाता सीटवरुन भाजपच्या नारायण पटेल यांना विजय मिळाला आहे. तिकडे ब्यावरामध्ये काँग्रेसचे रामचंद्र दांगी यांनी विजय मिळवला आहे.
तिकडे चंबलच्या सुमावली सीटवर मंत्री एंदल सिंह कंषाना 16 हजार पेक्षा जास्त मतांनी पिछाडीवर आहेत. त्यांचा पराभव जवळपास निश्चित मानला जात आहे. तिकडे मांधाता सीटवरुन भाजपचे नारायण पटेल 22 हजारांपेक्षा जास्त मतांनी जिंकले आहेत. मात्र आयोगाने अद्याप याची घोषणा केलेली नाही.
पोट निवडणुकांच्या निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. आता 27 जागांमधून 20 सीटवर भाजप आणि 6 सीटवर काँग्रेस पुढे आहे. तर 1 सीटवर (मुरैना) येथे बसपा पुढे आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीच्या कौलनुसार भाजपचे कमळ उमलताना दिसतेय. मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी दुपारी 12.45 वाजता ट्विट करत म्हटले की, जनताने पुन्हा एकदा विकास आणि जनकल्याणासाठी भाजपला मध्यप्रदेशची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.
तिकडे दुपारी 1.30 वाजता निकालांचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर कमलनाथ यांनी प्रदेश काँग्रेस कार्यालय सोडले आहे. तिथे माध्यमांनी त्यांच्यासोबत बातचित करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते कुणालाही काहीच बोललेले नाहीत. यापूर्वी जेव्हा कमलनाथ ऑफिसमध्ये आले होते तेव्हा ते म्हणाले होते की, एका तासात सर्व क्लीयर होईल. ते सकाळी हनुमान मंदिरात दर्शनासाठीही गेले होते.
केंद्रीय मंत्री तोमरच्या मुरैनामध्ये भाजप तिसऱ्या नंबरवर आहे
काँग्रेस आणि भाजपमध्ये मुरैनामध्ये बसपाही मजल मारताना दिसत आहे. येथे बसपा उमेदवार रामप्रकाश राजौरिया आघाडीवर आहे. येथे काँग्रेस दुसऱ्या आणि भाजप तिसऱ्या नंबरवर आहे. विशेष म्हणजे हे सीट केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमरच्या प्रभावातील असल्याचे मानले जात आहे. शिवराज यांनी रॅली दरम्यान मंचावर तोमर यांच्या उपस्थितीत म्हटले होते की, तुमच्या क्षेत्राचे खासदार नरेंद्र सिंह तोमर आहेत. ते नरेंद्र मोदींच्या शेजारी बसतात. यामुळे येथे भाजप उमेदवाराचे जिंकणे आवश्यक आहे. त्याच मुरैना सीटवर भाजप उमेदवार तिसऱ्या नंबरवर आहे. नरेंद्र सिंह तोमर यांनी येथे 7 वेळा रॅली घेऊन निवडणुकीचा प्रचार केला होता.
14 जागा, येथे मंत्र्यांचे नशीब टांगणीला
सीट | कोणाकोणात लढत | कोण आघाडीवर |
सांवेर | तुलसीराम सिलावट (भाजपा) आणि प्रेमचंद गुड्डू (काँग्रेस) | तुलसीराम सिलावट |
सुरखी | गोविंद सिंह राजपूत (भाजपा) आणि पारुल साहू (काँग्रेस) | गोविंद सिंह राजपूत |
ग्वालियर | प्रद्यु्म्न सिंह तोमर (भाजपा) आणि सुनील शर्मा (काँग्रेस) | प्रद्यु्म्न सिंह तोमर |
डबरा | इमरती देवी (भाजपा) आणि सुरेश राजे (काँग्रेस) | इमरती देवी |
बमोरी | महेंद्र सिंह सिसौदिया (भाजपा) आणि कन्हैया लाल (काँग्रेस) | महेंद्र सिंह सिसौदिया |
सुमावली | एंदल सिंह कंषाना (भाजपा) आणि अजब सिंह कुशवाह (काँग्रेस) | अजब सिंह कुशवाह |
दिमनी | गिर्राज दंडोतिया (भाजपा) आणि रविंद्र सिंह तोमर (काँग्रेस) | रविंद्र सिंह तोमर |
बदनावर | राजवर्धन सिंह (भाजपा) आणि कमल पटेल (काँग्रेस) | राजवर्धन सिंह |
सांची | प्रभुराम चौधरी (भाजपा) आणि मदन लाल चौधरी (काँग्रेस) | प्रभुराम चौधरी |
पोहरी | सुरेश धाकड़ (भाजपा) आणि हरिवल्लभ शुक्ला (काँग्रेस) | सुरेश धाकड़ |
अनूपपुर | बिसाहूलाल सिंह (भाजपा) आणि विश्वनाथ सिंह कुंजाम (काँग्रेस) | बिसाहूलाल |
सुवासरा | हरदीप सिंह डंग (भाजपा) आणि राकेश पाटीदार (काँग्रेस) | हरदीप सिंह डंग |
मुंगावली | बृजेंद्र सिंह यादव (भाजपा) आणि कन्हाई राम लोधी (काँग्रेस) | बृजेंद्र सिंह यादव |
मेहगांव | ओपीएस भदौरिया (भाजपा) आणि हेमंत कटारे (काँग्रेस) | ओपीएस भदौरिया |
राज्यात 3 नोव्हेंबरला मतदान झाले होते
मतमोजणीदरम्यान माजी सीएम कमलनाथ यांनी भोपाळमध्ये कमला पार्क येथील हनुमान मंदिरात दर्शन घेतले. यानंतर पीसीसी ऑफिसमध्ये पोहोचले. येथे मीडियासोबत संवाद साधून त्यांनी म्हटले की, एक तास प्रतिक्षा करा, सर्व क्लियर होऊन जाईल.
सर्वात लवकर अनूपपुर जिल्ह्याचा निकाल येण्याची अपेक्षा आहे. येथे 18 राउंडमध्ये काउंटिंग होईल. सर्वात उशीरा ग्वालियरचा निकाल येथील येथे 32 राउंड काउंटिंग होईल. उप मुख्य निर्वाचन पदाधिकारी प्रमोद शुक्ला यांनी सांगितले की, यावेळी सोशल डिस्टेंसिंग ठेवण्यासाठी प्रत्येक राउंडमध्ये 14-14 टेबल असेल.
प्रदेशात 46619 पोस्टल बॅलेज टाकण्यात आले आहेत. सर्वात जास्त 3675 मेहगांवमध्ये आणि सर्वात कमी 491 करैरामध्ये पडले आहेत. अनूपपुरमध्ये सर्वात कमी 18 राउंड आहेत. यामुळे येथील निकाल सर्वात पहिले, तर 32 राउंडच्या ग्वालियर पूर्व येथील जागेचा निकाल सर्वात उशीरा येऊ शकतो.
इतर 9 राज्यांमधील पोटनिवडणुकांचे निकालही आजच, मतमोजणी सुरू
10 राज्यांत 52 जागांवरील पोटनिवडणुकाही मंगळवारी झाली. यामध्ये मध्य प्रदेशातील 28 जागांवरची मतमोजणी सुरू आहे. यासोबतच गुजरातेत 8, उत्तर प्रदेशात 7, कर्नाटक, ओडिशा, झारखंड व नागालँडमध्ये प्रत्येकी दोन, तर तेलंगण, छत्तीसगड व हरियाणात प्रत्येकी एका मतदारसंघातील मतमोजणी सध्या सुरू आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.