आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan Test Positive For Coronavirus (COVID 19) In Bhopal

शिवराज सिंह चौहानांना कोरोना:मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान कोरोना पॉझिटिव्ह, ट्विट करत दिली माहिती, म्हणाले - कोरोनाला घाबरायची गरज नाही

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटव्ह आला आहे. ते म्हणाले की, माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना आवाहन आहे की, त्यांनी कोरोना टेस्ट करुन घ्यावी. तसेच संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाइन व्हावे.

मुख्यमंत्र्यांनी स्वतः याविषयी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, मी कोरोना पॉझिटिव्ह आलो आहे. माझी सर्व साथिदारांना विनंती आहे की, जे माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी कोरोना टेस्ट करुन घ्यावी. माझ्या नियमित संपर्कात येणाऱ्यांनी क्वारंटाइन सेंटरमध्ये जावे. याविषयी त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

मी कोरोना गाइड लाइनचे पूर्ण पालण करत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वतःला क्वारंटाइन करेल आणि उपचार करुन घेईल. मध्य प्रदेशच्या जनतेला माझे अवाहन आहे की, त्यांनी सावधगिरी बाळगावी. थोडेही बेसावध झाला तर ते कोरोनाला निमंत्रण असू शकते. मी कोरोनापासून सावध राहण्यासाठी शक्य ते प्रयत्न केले. मात्र समस्यांसाठी अनेक लोकांशी भेटी झाल्या. माझा सर्व लोकांना सल्ला आहे की, जे मला भेटले त्यांनी कोरोना टेस्ट करुन घ्यावी.

कोरोनाला घाबरण्याची आवश्यक नाही: सीएम शिवराज

कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. कोरोनावर वेळेवर उपचार केले तर कोरोना बरा होतो. मी 25 मार्च पासून प्रत्येक संध्याकाळी कोरोना समीक्षा बैठक करतो. मी आता शक्यतो व्हिडिओ कॉन्फ्रेंसवर कोरोनाची समिक्षा करण्याचा प्रयत्न करेल. माझ्या अनुपस्थितीत ही बैठक गृहमंत्री नरोत्तम मिश्रा, नगरीय विकास आणि प्रशासन मंत्री भूपेंद्र सिंह, आरोग्य शिक्षण मंत्री विश्वास सारंग आणि आरोग्य मंत्री डॉ. प्रभु राम चौधरी करतील.

मी स्वतः क्वारंटाइन राहत उपचारादरम्यान प्रदेशातील कोरोना नियंत्रणासाठी शक्यते प्रयत्न करेल. तुम्ही सर्व सावध राहा, सुरक्षित राहा आणि गाइडलाइनचे पालन अवश्य करा.