आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Madhya Pradesh Coronavirus News; Bhopal Bhadbhada Shamshan Ghat Update | 112 Coronavirus Death Single Day In Bhopal, Only 4 In Government Records

40 मृतदेहांवर एकदाच अंत्यविधी:स्मशानाकडे बोट दाखवत चिमुकली म्हणाली- काका, माझी आई देवाकडे जात आहे, प्लीज तिचा एक फोटो काढा...

भोपाळ9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळमध्ये एका दिवसात 112 रुग्णांचा मृत्यू झाला, पण सरकारी रेकॉर्डमध्ये फक्त 4 ची नोंद - Divya Marathi
भोपाळमध्ये एका दिवसात 112 रुग्णांचा मृत्यू झाला, पण सरकारी रेकॉर्डमध्ये फक्त 4 ची नोंद
  • फोटो जर्नलिस्ट संजीव यांना रात्रभर झोप लागली नाही

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील भदभदा विश्राम घाटाचा एक फोटो शुक्रवारी दैनिक भास्करच्या पहिल्या पानावर प्रकाशित झाला. या फोटोत एकदाच 40 पेक्षा जास्त कोरोना मृतांची चिता जळताना दिसत आहे. या फोटोतून भोपाळमधील कोरोनाची दाहकता पत्रकार संजीव सांगत आहेत…‘गुरुवारी संध्याकाळी जेव्हा मी भदभदा विश्राम घाटावर कोरोना रुग्णांचा अंत्यविधी कव्हर करण्यासाठी गेले होतो. तेव्हा मला वाटल, आज रोजप्रमाणे मोजके मृतदेह येतील. पण, संध्याकाळी 6 वाजेनंतर रुग्णांचे मृतदेह येण्याचा वेग वाढला. यावेळी ड्रोन आणि स्टील कमेऱ्यातून काही फोटो आणि व्हिडिओ शूट केले.'

'त्यावेळेस तिथे एकदाच 45 जणांचे मृतदेह जळत होते. मी खाली उभा असल्यामुळे निट दिसत नव्हते, पण जेव्हा ड्रोन कॅमेऱ्यातून पाहिले, तेव्हा मला जबर धक्का बसला. येथे संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत मृतदेह येणे सुरुच होते. मी 1984 मध्ये झालेल्या गॅस गळतीदरम्यानही फोटो काढले होते, पण हे दृष्य त्यापेक्षा भयावहः होते.'

'यादरम्यान एक अशी घटना घडली, ज्यामुळे मला रात्रभर झोप आली नाही. जेव्हा मी फोटो काढत होतो, तेव्हा 10-12 वर्षांचे भाऊ-बहिण माझ्याजवळ उभे होते. भदभदा विश्राम घाटाच्या विद्युत स्मशानाकडे बोट दाखवत चिमुकली मला म्हणाली- काका माझी आई जात आहे, प्लीज तिचा एक फोटो काढा...मी तिला त्यावेळेस काहीच बोलू शकलो नाही. घरी गेल्यावर मला रात्रभर झोप आली नाही. त्या चिमुकलीचा आवाज रात्रभर मला ऐकू येत होता...'

संजीव सांगतात, 'यात दोष कुणाचा आहे, माहित नाही. पण, प्रशासन आणि सरकारचा हलगर्जीपणा स्पष्टपणे दिसतो.'

दैनिक भास्करमध्ये शुक्रवारी प्रकाशित झालेला फोटो जर्नलिस्ट संजीव गुप्ता यांनी काढला आहे. संजीव यूरोपियन फोटो एजेंसीच्या मध्यप्रदेश कॉरेस्पॉन्डेंट आहेत. तसेच, ते फ्रीलासिंगपण करतात.

सरकारी आकड्यानुसार, 21 मृत्यू झाले, पण 5 दिवसात 356 संक्रमितांचा अंत्यविधी झाला

मध्य प्रदेश सरकारने आधी संक्रमितांचे आकडे लपवले, आता मृतांचे आकडे लपवत आहे. आज हॉस्पीटलमध्ये आणि स्मशानभूमीतही जागा नाही. रुग्णांना घेऊन कुटुंबीय जागोजागी भटकत आहेत. म्हणूनच आज स्मशानभूमीतील दाहकता परिस्थिती सांगत आहे...

गुरुवारी भोपाळमध्ये 112 कोरोना संक्रमितांचा अंत्यविधी झाला. यात भदभदामध्ये 72, सुभाष नगरमध्ये 30 अंत्यविधी आणि झदा कब्रस्तानमध्ये 10 दफनविधी झाले. पण,सरकारी आकड्यामध्ये फक्त चार जणांचे मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. मागच्या पाच दिवसात 356 संक्रमितांचा अंत्यविधी झाला, पण सरकारी आकड्यामध्ये फक्त 21 ची नोंद आहे.

बातम्या आणखी आहेत...