आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कन्या प्रथम पूज्य:मध्य प्रदेशात मुलींचे पूजन करून सुरू होतील सरकारी कार्यक्रम, शिवराजसिंह चौहान सरकारने जारी केला आदेश

भोपाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्व विभाग आणि जिल्हा प्रशासनांना या आदेशाचे पालन करणे बंधनकारक
  • दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमापासून होणार सुरुवात

मध्य प्रदेशात आता कोणताही सरकारी कार्यक्रम आयोजित झाला तर मुलींचे पूजन करून त्यांचा प्रारंभ केला जाईल. याबाबत गुरुवारी मध्य प्रदेश सरकारने आदेश जारी केला आहे. सर्व विभाग आणि जिल्हा प्रशासनांना या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असेल.

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी १५ ऑगस्ट २०२० ला स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात याबाबतची घोषणा केली होती. शिवराजसिंह चौहान यांच्या पूर्वीच्या कार्यकाळातही सरकारमध्ये मुलींचे पूजन आणि त्यांचे पाय धुऊन कार्यक्रमांची सुरुवात केली होती होती. मात्र तेव्हा या प्रकारचा सरकारी आदेश जारी करण्यात आला नव्हता. आता सर्व सरकारी कार्यक्रमांआधी मुलींचे पूजन केले जाईल. त्यांची सुरुवात २५ डिसेंबरला दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमापासून होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...