आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दुःखद:मध्यप्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन, वयाच्या 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

लखनऊ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्यप्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन (85) यांचे मंगळवारी सकाळी 5.30 वाजता निधन झाले. टंडन यांना 11 जून रोजी श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे लखनऊच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. सोमवारी संध्याकाळी हॉस्पिटलच्या मेडिकल बुलेटिनमध्ये त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले होते. आज संध्याकाळी 4.30 वाजता लखनऊ येथे अंत्यसंस्कार केले जातील. पंतप्रधान मोदी यांनी टंडन यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. उत्तरप्रदेश सरकारने 3 दिवस राजकीय शोकची घोषणा केली आहे.