आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Madhya Pradesh Indore MY Hospital Case Update | Girls Boy Found Naked In Mortuary Room, Photos Goes Viral

मध्यप्रदेश रुग्णालय प्रकरण:शवागारात तरुणींसोबत कर्मचाऱ्यांचे अश्लील चाळे, इंदूरमधील सर्वात मोठ्या एमवाय रुग्णालयातील घटना

इंदूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • खोलीमध्ये दोन मुली आण‍ि दोन मुले होते, लोकांनी फोटो काढताच त्यांनी तेथून पळ काढला

मध्यप्रदेशातील इंदुर येथील सर्वात मोठ्या महाराजा यशवंतराव रुग्णालयाच्या शवगृहात रुग्णालयाचे कर्मचारी मध्यरात्री तरुणींसोबत अश्लील चाळे करताना आढळून आल्याची घटना समोर आली आहे. संबंधित प्रकरणातील फोटो आण‍ि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, यात अर्ध्या कपड्यावर मुली आण‍ि कर्मचारी दिसत आहे. दावा करण्यात येत आहे की, हे फोटो महाराजा यशवंतराव रुग्णालयाच्या शवगृहातील आहेत.

रुग्णालय व्यवस्थापनाला याची कल्पनादेखील नव्हती
महाराजा यशवंतराव रुग्णालयाच्या शवगृह देखरेखीचे काम युडीएस या एका खाजगी कंपनीकडे दिलेले आहे. रुग्णालयातील या कंपनीचे कर्मचारी मागील चार ते पाच दिवसांपासून सतत मध्यरात्री मुलीला बोलावून त्यांच्यासोबत अश्लील चाळे करत होते. याची माहिती हॉस्पीटल व्यवस्थापनाला नव्हती. असे व्हिडियो आण‍ि फोटो प्रसारित करण्याऱ्याने सांगितले.

खोलीमध्ये दोन मुली आण‍ि दोन मुले होते. लोकांनी फोटो काढताच त्यांनी तेथून पळ काढला
खोलीमध्ये दोन मुली आण‍ि दोन मुले होते. लोकांनी फोटो काढताच त्यांनी तेथून पळ काढला

ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली असून जेव्हा काही लोक मृतदेह घेऊन शवगृहात आले, तेव्हा त्यांना शवगृहामध्ये कर्मचाऱ्यांसोबत तरुणी दिसल्या. मृतदेह आणलेल्या लोकांनी या कर्मचाऱ्यांना प्रश्न उपस्थित केला असता, तुम्हाला काय करायचे? मृतदेह ठेवा व निघून जा? असे उत्तर कर्मचाऱ्यांनी दिले. यानंतर त्या लोकांनी फोटो आण‍ि व्हिडिओ काढले. त्यानंतर कर्मचारी मुलींना घेऊन खोलीबाहेर आले.

दोन्ही कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करत कंपनीला नोटीस
संबंधित प्रकरण समोर आल्यानंतर हॉस्पीटल व्यवस्थापनाने दोन्ही कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले असून संबंधित कंपनीला नोटीस बजावली आहे. अशी माहिती महाराजा यशवंतराव रुग्णालयाचे अधीक्षक पीएस ठाकुर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...