आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामध्य प्रदेशातील खरगोनमध्ये मंगळवारी सकाळी 8.40 च्या सुमारास एक बस 50 फूट उंच पुलावरून नदीत कोसळली. त्यात 22 जणांचा मृत्यू झाला. मृतांत 3 मुलांसह 9 महिला व 10 पुरुषांचा समावेश आहे. अपघातग्रस्त बस डोंगरगाव व दसंगादरम्यानच्या नदीवरील पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली. नदी कोरडी होती. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या घटनेच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिलेत. 30 हून अधिक जखमींना जिल्हा रुग्णालायत दाखल कर्यात आले आहे. 7 जखमींवर इंदूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डोंगरगावच्या राज पाटीदार यांनी सांगितले की, माँ शारदा ट्रॅव्हल्सच्या या बसमध्ये 50 हून अधिक प्रवाशी होते. पोलिस - प्रशासन पोहोचण्यापूर्वीच डोंगरगाव व लोणारा गावच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. आम्ही बसच्या काचा फोडून जखमींना बाहेर काढले. त्यांना आपल्या वाहनांतून रुग्णालयात पोहोचवले. ही बस 5 मिनिटांपूर्वीच आमच्या गावावरून गेली होती. ती अत्यंत भरधाव वेगाने जात होती.
खरगोनचे सिव्हिल सर्जन डॉ. अमर सिंह चौहान यांनी सांगितले की, 3 जखमींचा मृत्यू जिल्हा रुग्णालायत झाला आहे. सुरुवातीस या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आले होते. पण कलेक्टर शिवराज सिंह वर्मा यांनी या घटनेत 22 जणांचा बळी गेल्याचे स्पष्ट केले आहे.
बसमध्ये 50 हून अधिक प्रवाशी होते
घटनास्थळी रुग्णवाहिका व प्रशासनाचे अधिकारी उपस्थित आहेत. आयजी राकेश गुप्ता यांच्या माहितीनुसार, बस खरगोनच्या बेजापूरहून इंदूरच्या दिशेने जात होती. वेग जास्त असल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस पुलाचा कठडा तोडून थेट नदीत कोसळली. बसमध्ये 50 हून अधिक प्रवाशी होते. नदी कोरडी असल्यामुळे बहुतांश प्रवाशांना दुखापत झाली. घटनेत 17 प्रवाशांचा मृत्यू झाला. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात येत आहेत.
ड्रायव्हरला डुलकी लागली असावी -एसडीएम
एसडीएम यांनी सांगितले की, हा अपघात जिल्हा मुख्यालयापासून 34 किमी अंतरावरील उन पोलिस स्टेशन हद्दीतील डोंगरगावजवळ घडला. सध्या बस चालकाचा पत्ता लागला नाही. प्राथमिक माहितीनुसार, चालकाला डुलकी लागल्यामुळे बसवरील नियंत्रण सुटल्याचे दिसून येत आहे.
बसमध्ये 40 हून अधिक होते प्रवाशी
डोंगरगाव येथील राज पाटीदार यांनी सांगितले की, माँ शारदा ट्रॅव्हल्समधून 50 ते 55 प्रवाशी प्रवास करत होते. अपघातानंतर डोंगरगाव व लोणारा गावातील ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी काचा फोडून जखमींना बसमधून बाहेर काढले. ग्रामस्थांनी सांगितले की, 5 मिनिटे अगोदरच ही बस आमच्या गावावरून गेली होती. ती अत्यंत भरधाव वेगाने जात होती.
सरकारकडून मदत घोषित
दुसरीकडे, खरगोन बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मध्य प्रदेश सरकारने आर्थिक मदत घोषित केली आहे. त्यानुसार, या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख, गंभीर जखमींना प्रत्येकी 50 हजार व किरकोळ जखमींना प्रत्येकी 25 हजार रुपयांची मदत दिली जाईल.
मध्य प्रदेश सरकारने जखमींवर मोफत मोफत उपचार करण्याचेही आदेश दिलेत.
पाहा अपघाताचे फोटो....
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.