आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोकायुक्त पोलिसांनी गुरुवारी भोपाळ येथील पोलिस गृहनिर्माण महामंडळात नियुक्त सहायक अभियंता (कंत्राटी) हेमा मीना यांच्या फार्म हाऊसवर छापेमारी केली. त्यात या महिला इंजिनिअरच्या कोट्यवधीचे घबाड सापडले आहे. त्याचे मूल्यांकन शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सुरू आहे. दरमहा 30 हजार रुपये वेतन असणाऱ्या या इंजिनिअरच्या बंगल्यात आढळलेल्या एका टीव्हीची किंमत तब्बल 30 लाख रुपये आहे. यावरून त्यांच्या अफाट संपत्तीचा अंदाजा लावता येतो.
लोकायुक्त पोलिसांच्या माहितीनुसार, कंत्राटी नोकरी करणाऱ्या सहाय्यक इंजिनिअर हेमा मीना यांचे मासिक वेतन 30 हजार रुपये आहे. पण त्यांनी आपल्या 13 वर्षांच्या नोकरीत उत्पन्नापेक्षा 232% अधिक संपत्ती गोळा केली आहे. त्यांना मिळणाऱ्या वेतनाच्या हिशेबाने हेमा यांची संपत्ती अधिकाधिक 18 लाख रुपये असावयास हवी होती.
40 खोल्यांचा बंगला
सहाय्यक अभियंता हेमा मीना त्यांच्या वडिलांच्या नावे असणाऱ्या 20,000 चौरस फुटांवर बांधलेल्या तब्बल 40 खोल्यांच्या बंगल्यात राहतात. त्याची किंमत 1 कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे. याशिवाय त्याच्या फार्म हाऊसमधून 50 हून अधिक परदेशी जातीचे कुत्रे आढळलेत. त्यांचीही किंमत लाखोंमध्ये आहे. विविध जातींच्या सुमारे 60-70 गायीही येथे आढळून आल्यात.
रोटी बनवण्याचे मशीन
विशेष बाब म्हणजे हेमा मीना यांनी 20 हजार स्क्वेअर फूट परिसरात राहणाऱ्या डझनभर कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी वॉकीटॉकीचा वापर करतात. एवढेच नाही तर लोकायुक्त पोलिसांच्या छाप्यात कंत्राटी अभियंत्याच्या बंगल्यातून रोटी बनवण्याचे मशीनही सापडले आहे. 2.50 लाख रुपये किमतीचे हे मशीन कुत्र्यांसाठी भाकरी बनवण्यासाठी वापरले जाते.
30 लाखांचा केवळ 1 टीव्ही
हेमा मीना यांचा बंगला आलिशान वस्तूंनी भरलेला आहे. 30 हजार मासिक पगार घेणाऱ्या कंत्राटी अभियंत्याच्या खोलीत तब्बल 30 लाख रुपयांचा टीव्ही संच जप्त करण्यात आला आहे. सध्या ही टीव्ही वापरात नव्हती. ती बॉक्समध्ये पॅक केलेली होती. याशिवाय अभियंत्याच्या बंगल्यातून 2 ट्रक, 1 टँकर, महिंद्रा थार अशी 10 महागडी वाहनेही आढळली आहेत.
सोलर पॅनल तपासण्याच्या बहाण्याने पथक बंगल्यात शिरले
लोकायुक्त पोलिसांचे 50 जणांचे पथक हेमा मीना यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोहोचले तेव्हा बंगल्यावर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखले. त्यानंतर सिव्हिल ड्रेसमध्ये आलेल्या टीम सदस्यांनी स्वतःची ओळख पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी म्हणून करवून दिली. तसेच बंगल्यात बसवण्यात आलेले सोलर पॅनल तपासण्याचा बहाणाही त्यांनी केला. त्यानंतर त्यांना आत प्रवेश मिळाला. त्यानंतर आत उपस्थित असलेल्या हेमा मीना यांना एका खोलीत बसवून त्यांचा मोबाईल जप्त करून कारवाई सुरू केली.
13 वर्षांपूर्वी मिळाली नोकरी
पतीपासून घटस्फोट घेतलेल्या हेमा मीना रायसेन जिल्ह्यातील छपना गावच्या आहेत. 2011 मध्ये त्यांना कंत्राटी नोकरी मिळाली. सध्या त्या मध्य प्रदेश पोलिस गृहनिर्माण महामंडळात प्रभारी सहायक अभियंता म्हणून कार्यरत आहेत.
लोकायुक्त डीएसपी संजय शुक्ला यांच्या माहितीनुसार, 2020 मध्ये पोलिस गृहनिर्माण महामंडळाचे प्रभारी सहायक अभियंता (कंत्राटी) यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्ता कमावल्याची तक्रार आली होती. या प्रकरणी विशेष पोलिस आस्थापना भोपाळ विभागाने (लोकायुक्त) तपास सुरू केला. त्यानंतर आता छाप्याची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात इतर काही अधिकाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता आहे. पुढील तपास सुरू आहे.
छाप्यात काय आढळले?
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.