आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामध्य प्रदेशातील मुरैनाच्या लेपा भिसोडा गावात शुक्रवारी सकाळी एकाच कुटुंबातील 6 जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, गावातील 2 कुटुंबांमध्ये गत 10 वर्षांपासून वाद सुरू होता. या वादातून शुक्रवारी सकाळी एका कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबावर गोळीबार केला. त्यात एकाच कुटुंबातील 3 पुरुषांसह 3 महिलांचा मृत्यू झाला, तर 3 जण जखमी झाले. काँग्रेस आमदार रवींद्र सिंह यांचे हे गाव आहे.
मुरैना येथील हत्याकांडाचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. त्यात हल्लेखोर काही जणांना काठीने मारहाण करत असल्याचे दिसून येत आहेत. तसेच काही जण बंदुका व लाठ्या घेऊन रस्त्यावर उभे आहेत. त्यापैकी 1 तरुण 5 जणांवर बेछूट गोळीबार करतो, असेही व्हिडिओत दिसून येत आहे.
गोळी लागल्यामुळे 3 पुरुष व 2 महिला जमिनीवर कोसळल्या. घटनास्थळी लहान मुलेही होती. त्यांना एका महिलेने आवाज देऊन घरात बोलावले. व्हिडिओमध्ये या महिलेचा आवाजही येत आहे. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
हत्याकांडाची छायाचित्रे...
या 6 जणांचा झाला मृत्यू
या गोळीबारात वीरेंद्र सिंह यांची पत्नी लेस कुमारी, नरेंद्र सिंह तोमर यांची पत्नी बबली, सुनील तोमर यांची पत्नी मधु कुमारी या 3 महिलांसह बदलू सिंह यांचा मुलगा गजेंद्र सिंह व गजेंद्र सिंह यांच्या सत्यप्रकाश व संजू या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींत विनोद सिंह व वीरेंद्र सिह यांचा समावेश आहे.
2014 मध्येही वादातून झाले होते 3 खून
लेपा गावातील रणजित तोमर व राधे तोमर यांच्यात जमिनीवरून वाद सुरू होता. 2014 मध्ये रणजीत तोमरच्या गटाने राधे तोमरच्या कुटुंबातील 3 सदस्यांची हत्या केली होती. त्यानंतर रणजितच्या कुटुंबाने गाव सोडले होते. पण काही दिवसांपूर्वीच तो गावी परतला होता. त्यानंतर सूड उगवण्याच्या उद्देशाने त्याने हा हल्ला केला.
डाकू पानसिंग तोमरचे गाव जवळच
लेपा गावाजवळच भिडोसा गाव आहे. डाकू पानसिंग तोमर हा भिडोसा गावचा होता. त्याच्यावर एक चित्रपटही आला आहे. पानसिंग तोमरचाही गावातील काही लोकांशी जमिनीवरून वाद झाला होता. त्यामुळे तो दरोडेखोर बनला होता. विशेष म्हणजे दोन्ही गावे लेपा-भिडोसा या नावाने ओळखली जातात.
माजी मुख्यमंत्री कलमनाथ यांचे हत्याकांडावर भाष्य
माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली. ते एका ट्विटमध्ये म्हणाले -'मुरैना जिल्ह्यात दिवसाढवळ्या 6 जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना राज्यातील कायदा सुव्यवस्थेपुढील गंभीर आव्हान आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या अनेक घटना घडत आहेत. पण सरकारला स्थितीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश येत आहे. मुख्यमंत्र्यांनी अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची गरज आहे.'
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.