आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Madhya Pradesh News : Video OF Madhya Pradesh Farmer Beaten Up By Police In Guna

मध्य प्रदेश:जमिनीवरील ताबा हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांची दलित शेतकरी दांपत्याला बेदम मारहाण, पती-पत्नीने घटनास्थळीच विष प्राशन केले

गुना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुनातील जमीन अतिक्रमण हटविणाऱ्या पोलिसांनी दलित शेतकरी आणि त्याच्या पत्नीला लाठीने मारहाण केली.
  • शेतकरी अधिकाऱ्यांना म्हणाला - मी कब्जेदार नाही, बटाईसाठी जमीन घेतली, दोन लाखांचे कर्ज आहे
  • गुना येथे मंगळवारी पोलिस-प्रशासनाची टीम शेतकऱ्यांकडून जमीन ताब्यात घेण्यासाठी गेले होते

मध्यप्रदेश पोलिसांनी एका शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी व्हिडिओ शेअर करत लिहिले की, शिवराज सरकार राज्याला कोठून कुठे घेऊन जात आहे? हा कसला जंगल राज आहे?

सदरील घटना मंगळवारी घडली. मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता खळबळ उडाली आहे. गुनाच्या कॅंट भागात पोलिस दलाची टीम दलित शेतकरी जोडप्याच्या ताब्यातील जमीन सोडवण्यासाठी गेली होती. या कारवाई दरम्यान पोलिसांनी शेतकरी पती-पत्नी आणि त्यांच्या मुलांना काठ्यांनी मारहाण केली. 

याप्रकरणी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी रात्री उशिरा गुनाचे जिल्हाधिकारी व एसपी यांना त्वरित हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोबतच उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही दिले. 

कमलनाथ म्हणाले - निष्पाप मुलांना मारहाण करणे कसला न्याय आहे

कमलनाथ यांनी ट्विट केले की, जर पीडिताचा जमिनीबाबत काही वाद असेल तर तो कायदेशीररित्या सोडवला जाऊ शकतो. अशाप्रकारे कायदा हातात घेत, शेतकरी, त्याची पत्नी, कुटुंबातील लोक आणि निर्दोष मुलांना इतकी निर्दयपणे मारहाण करणे कुठला न्याय आहे. तो दलित कुटुंबातील आणि गरीब शेतकरी आहे म्हणून हे सर्व सुरू आहे का? असा सवालही कमलनाथ यांनी केला. 

पोलिसांनी काठ्या आणि लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण 

विज्ञान महाविद्यालयाला दिलेली जमीन ताब्यात घेताना एका दलित जोडप्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ही घटना जगनपूर चकमध्ये मंगळवारी दुपारी 2.30 वाजता घडली. दांपत्य आपल्या 7 मुलांसह प्रशासकिय आणि पोलिस अधिकाऱ्यांसमोर हात जोडत राहिले, त्यांचे म्हणणे होती की, ही जमिन गप्पू पारदीने त्यांना बटाईसाठी दिली होती. कर्ज घेऊन त्यांनी पेरणी केली. जर पीक उद्ध्वस्त केले तर तो बर्बाद होईल. मात्र शेतकऱ्याची विनंती कोणीच ऐकली नाही. 

दांपत्याने विष प्राशन केल्यानंतर मुले त्यांना बिलगून रडत होती
दांपत्याने विष प्राशन केल्यानंतर मुले त्यांना बिलगून रडत होती

ट्विटरवर गुनाचे प्रकरण टॉप ट्रेंडवर, लोकांनी केली शिवराज सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी 

गुनात पोलिसांनी शेतकरी जोडप्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ आणि संपूर्ण प्रकरण ट्विटरवर टॉप ट्रेंड होत आहे. ट्विटरवर लोक सरकार आणि पोलिसांवर टीका करत आहेत. तसेच शिवराज सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. या प्रकरणावर दर दोन मिनिटांनी एक ट्विट आणि रीट्वीट येत आहे.

कुटुंबीयांनी हात जोडले, पाया पडले, परंतु पोलिसांनी त्यांचे काहीच ऐकले नाही

माजी नगरसेवक गप्पू पारडी आणि त्याच्या कुटुंबीयांचा या जमिनीवर अनेक वर्षांपासून कब्जा केला आहे. पारदी कुटुंबाने राजकुमार अहिरवार या शेतकऱ्याला बटाईवर जमीन दिली होती. शेतकरी राजकुमार याचे म्हणणे आहे की, त्याने 2 लाखाचे कर्ज काढून पेरणी केली आहे. याआधीचे त्याच्यावर 2 लाखांचे कर्ज आहे. त्याने हा कब्जा नंतर काढून घेण्याची पोलिस आणि प्रशासनाला विनंती केली. 

मात्र पोलिसांनी ताबा हटवण्यास सुरुवात केली. यादरम्यान राजकुमार आणि त्याच्या पत्नीने विष प्राशन केले आणि जमिनीवर कोसळले. लहान मुले त्यांना बिलगुन रडत होते. काही वेळाने दोघांनाही जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. राजकुमारच्या लहान भावाने विरोध केला असता, पोलिसांनी त्यालाही काठ्यांनी मारहाण केली. मात्र असे काहीही झाले नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे होते.