आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Madhya Pradesh Political Drama; Kamal Nath, Jyotiraditya Scindia, Shivraj Singh Chouhan And Congress MLA

मध्य प्रदेशातील सर्वात मोठ्या राजकीय नाट्याची कहाणी:सुरुवातीला का अपयशी ठरली भाजपची तख्तापालटाची मोहिम, आमदार रामबाई यांनी हॉटेलात का ताणली होती बंदूक?

भोपाळ | राजेश शर्मा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

20 मार्च 2020…मध्य प्रदेशाच्या राजकारणाचा तो दिवस, जेव्हा 15 वर्षांनंतर सत्तेवर आलेले काँग्रेस सरकार अवघ्या 15 महिन्यांतच कोसळले. कमलनाथ या सरकारचे नेतृत्व करत होते. ज्योतिरादित्य शिंदे व त्यांच्या सहकारी 22 काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्यानंतर बसप व अपक्षांच्या टेकूवर चालणारे हे सरकार अल्पमतात आले. कमलनाथ सरकारच्या तख्तापालटाचे कोणते दुवे होते? या घटनेला 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आम्ही तुम्हाला मध्य प्रदेशाच्या त्या सर्वात मोठ्या राजकीय नाट्याचा घटनाक्रम रितसर सांगणार, तसेच अनेक धक्कादायक खूलासेही करणार;

आज वाचा पार्ट-1…

2-3 मार्च 2020 च्या मध्यरात्री भोपाळपासून गुरुग्रामपर्यंत भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’

2-3 मार्चची मध्यरात्र… या दिवशी कमलनाथ सरकार पाडण्याचा ट्रेलर रिलीज झाला. ठिकाण होते गुरुग्रामच्या मानेसर येथील आयटीसी ग्रँड भारत हॉटेल. ‘एमपी’ची नंबर प्लेट असणारी अनेक वाहने त्या रात्री या ठिकाणी लागोपाठ पोहोचत होती. सप आमदार राजेश शुक्ला (बबलू), बसपचे संजीव सिंह कुशवाह, काँग्रेसचे ऐंदल सिंह कंसाणा, रणवीर जाटव, कमलेश जाटव, रघुराज कंसाणा, हरदिप सिंह, बिसाहुलाल सिंह व अपक्ष सुरेंद्र सिंह शेरा. भाजपचे अरविंद भदौरिया, नरोत्तम मिश्रा व रामपाल सिंह पूर्वीपासूनच हॉटेलात हजर होते. दुसरीकडे, बसपच्या निलंबित आमदार रामबाई यांना घेवून भूपेंद्र सिंह भाजप नेत्याच्या एका चार्टर्ड प्लेनने भोपाळहून दिल्लीला पोहोचतात.

याचदरम्यान अपक्ष व काँग्रेसच्या काही आमदारांच्या दिल्लीत हालचाली सुरु असल्याची बातमी लीक झाली. एका आमदाराच्या निकटवर्तियाने फोनवरुन कुणाला तरी आपण दिल्लीत आल्याचे सांगितले व ही माहिती काँग्रेसपर्यंत पोहोचली. त्यानंतर दिग्विजय सिंहांपासून कमलनाथ व जीतू पटवारींपासून जयवर्धन सिंहांपर्यंत सर्वजण सक्रिय झाले.

रात्री जवळपास 12 वाजता मंत्री जीतू पटवारी व जयवर्धन हॉटेलवर पोहोचतात. जवळपास 2 तास हाय प्रोफाईल राजकीय नाट्यानंतर त्यांना रामबाई व 3 काँग्रेस आमदार ऐंदल सिंह कंसाणा, रणवीर जाटव, कमलेश जाटव यांना घेवून येण्यात यश येते. रघुराज कंसाणा, हरदिप सिंह, बिहासूलाल सिंह, राजेश शुक्ला, संजीव सिंह कुशवाह व सुरेंद्र सिंह 4 मार्च रोजी दुपारी हॉटेलातून बाहेर पडतात. पण, ते भोपाळला पोहोचत नाहीत. भाजपचे नेते त्यांना घेवून बंगळुरु गाठतात. तिथे कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र यांच्यावर या आमदारांचा पाहुणचार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांना बंगळुरुच्या प्रेस्टीज पाम मिडॉजमध्ये ठेवण्यात आले.

रामबाईचा खूलासा-त्या रात्री दिग्विजय सिंह हॉटेलमध्ये आले नव्हते

आतापर्यंत असे मानले जात होते की, त्या रात्री जयवर्धन सिंह व जीतू पटवारी यांच्यासोबत दिग्विजय सिंहही आमदारांना घेण्यासाठी हॉटेलवर पोहोचले होते. पण, दिव्य मराठीशी चर्चा करताना रामबाई यांनी त्या रात्री दिग्विजय तिथे आले नसल्याचा खूलासा केला. ‘दिग्विजय सिंह त्या रात्री हॉटेलवर आले नव्हते. केवळ जीतू व जयवर्धनच होते. त्या रात्री जबरदस्त हाणामारी झाली. माझी बॅगही खेचण्यात आली. त्यामुळे मला एवढा राग आला की मी माझ्या अंगरक्षकाची रायफल हिसकावून कुणी कमी-जास्त केले तर थेट गोळी घालण्याची धमकी दिली’, असे त्या म्हणाल्या.

‘ऑपरेशन लोटस’-आमदार रामबाईच्या अंगरक्षकाच्या चुकीने अपयशी ठरले

सर्वकाही भाजपच्या प्लॅननुसार सुरू होते. पण, आमदार रामबाई यांच्या अंगरक्षकाच्या एका चुकीने भाजपचे संपूर्ण ऑपरेशन अपयशी ठरले. या आमदाराच्या अंगरक्षकाने भोपाळहून दिल्लीला रवाणा होताना आपल्या निकटवर्तियांना फोन केला व या फोनमुळे दिल्लीत आमदार गोळा होण्याची खबर लीक झाली. काँग्रेसला ऑपरेशन लोटस फेल करण्यासाठी मोठा वेळ मिळाला. काँग्रेस नेत्यांनी युद्धपातळीवर बचाव मोहिम सुरु केली. त्यानंतर रात्री 2 च्या सुमारास दोन्ही नेते आमदार रामबाईसह हॉटेलातून बाहेर पडताना दिसून आले.

या ठिकाणी पत्रकारही पोहोचले होते. यामुळेही भाजपचा खेळ बिघडला. तेव्हा दिग्विजय सिंह दिल्लीत होते. पण, ते हॉटेलवर गेले नव्हते. यादरम्यान हॉटेलात पोलीस तैनात करण्यात आले. यामुळे त्यावेळी हॉटेलच्या खोल्यात कोणकोणते आमदार थांबले होते हे ही समजायला मार्ग नव्हता. तेव्हा दिग्विजय यांनी मोठ्या चतुराईने रामबाईंच्या दिल्लीत शिक्षण घेणाऱ्या मुलीला हॉटेलवर पाठवले व अपडेट घेतले. यावेळी जे आमदार भाजपच्या संपर्कात होते, तेही त्या ठिकाणी उपस्थिति होते. त्या रात्रीपर्यंत कुणीच बंगळुरुला गेले नव्हते.

भाजपला कोणत्याही स्थितीत ऑपरेशन लोटस फेल होऊ द्यावयाचे नव्हते

भाजप हायकमांडने कोणत्याही स्थितीत ऑपरेशन लोटस अपयशी ठरणार नाही अशी अट ठेवली होती. पण, काँग्रेस सक्रिय झाल्यानंतर ते कमकूवत झाले. 5 मार्च रोजी नरोत्तम यांच्यासह अन्य नेते दिल्लीहून भोपाळला रवाणा झाले. त्यानंतर भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शिवराजसिंह चौहान यांना दिल्लीला पाचारण केले. दुसरीकडे, बंगळुरुहून अपक्ष आमदार सुरेंद्र सिंह शेरा यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला. त्यात त्यांनी आम्ही सर्वजण सरकारसोबत असल्याची ग्वाही दिली. या आमदारांची 4-5 मार्चला भाजपच्या मोठ्या नेत्यांसोबत बैठक होणार होती.

6 मार्चला पहिला राजीनामा…आमदार हरदिपसिंह डंग यांचा

मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असणारे आमदार हरदिपसिंह डंग यांनी 6 मार्चला अचानक राजीनामा दिला. त्यांचाही काँग्रेसच्या गायब आमदारांत समावेश होता. ते ज्योतिरादित्य यांचे समर्थक नव्हते. तसेच कमलनाथ-दिग्विजय गटाचेही नव्हते. त्यामुळे भाजपने त्यांच्याशी स्वतंत्रपणे संपर्क साधला व शिंदे लॉबीच्या आमदारांची सेफ लँडिंग होईपर्यंत एका ठाम रणनिती अंतर्गत त्यांना सर्वप्रथम राजीनामा द्यावयास लावला.

डंग यांच्या राजीनाम्यानंतर कमलनाथ सक्रिय झाले. काँग्रेसच्या सर्वच आमदारांना भोपाळला बोलावण्यात आले. तसेच त्यांना राजधानी न सोडण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी काँग्रेसने मध्यरात्री उशिरा युद्धपातळीवर प्रयत्न करुन 6 आमदारांची घरवापसी केली. पण, 5 आमदार अद्याप बेपत्ता होते. या आमदारांत हरदिप सिंह डंग, रघुराज सिंह कंसाणा, बिसाहूलाल सिंह व अपक्ष आमदार सुरेंद्र सिंह शेरा यांचा समावेश होता.

ऑपरेशन लोटस शिंदेवर कसे शिफ्ट झाले?

भाजपला कमलनाथ सरकार पाडण्यासाठी केवळ 7 आमदारांची गरज होती. त्यासाठी भाजपने मध्य प्रदेशातील काँग्रेसवर नाराज असलेल्या व अपक्ष आमदारांवर लक्ष्य केंद्रीत केले. कमलनाथ आमदारांच्या दबावात येत नाही हे सर्वांनाच ठावूक होते. त्यामुळे भाजपने या उपेकक्षित-असंतुष्ट आमदारांना 2 मार्च रोजी रात्री गुरुग्रामला नेले. पण, त्याचा भांडाफोड झाला.

सरकार पाडण्याची मोहिम अपयशी ठरत असल्याचे पाहून भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी मोहिमेची सूत्रे आपल्या हाती घेतली व प्लॅन B वर काम सुरु केले. याच्या केंद्रस्थानी ज्योतिरादित्य शिंदे होते. त्यांची त्यांचे मित्र तथा भाजपचे ज्येष्ठ नेते जफर इस्लाम यांनी हायकमांडशी बैठक घडवून आणली. त्यानंतर कमलनाथ सरकार पाडण्याचा हाय व्होल्टेज ड्रामा नव्याने सुरु झाला.

7 मार्च 2020 रोजी कमलनाथ यांनी हायकमांडचे ऐकले असते तर त्यांचे सरकार कसे वाचले असते, पण त्यांनी तसे का केले नाही? हे आम्ही सांगणार या मालिकेच्या दुसऱ्या भागात…

बातम्या आणखी आहेत...