आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मध्य प्रदेशच्या सीधी येथे सकाळी प्रवाशी बसला मोठा अपघात घडला. या ठिकाणी सकाळी 7 वाजेच्या सुमारास 54 प्रवाशांनी भरलेली बस रस्त्यावरून घसरून थेट बाणसागर सरोवरात कोसळली. या तलावातून 42 मृतदेह बाहेर काढण्यात आले. रामपूर जिल्ह्यातील नेकीन परिसरात घडलेल्या या घटनेत 45 जण मृत्यूमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ही बस सीधी येथून सतनाकडे जात होती. बसमधध्ये 54 प्रवाशी होते. नेकीन परिसरात आली असताना बस रस्ता सोडून थेट सरोवरमध्ये पडली. सरोवरातील पाण्याचा वेग जास्त असल्याने बचाव पथक पाणी कमी होण्याची वाट पाहत होते. पाण्याचा वेग जास्त असल्याने यात पडलेले लोक दूर वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसची क्षमता केवळ 32 प्रवाशांची होती. त्यात 54 प्रवाशी ठासून भरले होते. सीधी मार्गावरून बस सतनाकडे जात होती. पण, ट्रॅफिक असल्याने चालकाने नेहमीचा रूट बदलला. बस सरोवराला खेटून काढणे अतिशय धोकादायक होते. येथे रस्ता अतिशय अरुंद आहे. याच दरम्यान बसवरून चालकाचा ताबा सुटला आणि बस थेट सरोवरात घसरली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.