आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापापा...एखाद्यावेळी चूक झाली तर माफ करता येत नाही काय? टीचरने मला सर्वांपुढे अर्वाच्य शिवीगाळ केली...सुसाइड नोटमध्ये काळजाला भिडणारी ही वाक्य लिहून 14 वर्षांच्या एका विद्यार्थ्याने गळफास घेतला. त्याने वर्गातील एका विद्यार्थ्याची एक वस्तू चोरली होती. त्याची तक्रार शिक्षकाकडे करण्यात आली होती. शिक्षकाने त्याची बॅग तपासली असता त्यात ती वस्तू आढळली.
घटना मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यातील पडखुरी 588 गावचे आहे. अमित प्रजापती नवोदय विद्यालय चुरहटमध्ये इयत्ता 8वीत शिकत होता. त्याने 2 जानेवारी रोजी घरी गळफास घेतला. 19 डिसेंबर रोजी शिक्षक अजित पांडेने वर्गातील इतर विद्यार्थ्यांपुढे त्याचा अपमान केला होता. यामुळे त्याला मोठा मानसिक धक्का बसला होता. यामुळे तो तणावात होता.
20 डिसेंबर रोजी शालेय व्यवस्थापनाने अमितच्या पालकांना चोरीची माहिती दिली. त्याचे वडील शाळेत गेले व 20 डिसेंबर रोजीच त्याला घरी आणले. अमितच्या आईने खूप समजावले. चूक होतच असते, ताण घेऊ नको, असे सांगितले. पण अमितला आपला अपमान विसरता येत नव्हता. घटनेच्या 14 दिवसांनंतर त्याने गळफास लावून आपली जिवनयात्रा संपवली. अमितला आई-वडिलांसह 2 भाऊ व 1 बहीण आहे. अमित सर्वात लहान होता. वडील छत्तीसगडमध्ये विटा तयार करण्याचे काम करतात. मुलाचा मृत्यू झाला तेव्हाही ते छत्तीसगडमध्येच होते.
अमितची सुसाइड नोट जशीच्या तशी...
''प्रणाम पिताजी, मेरे को पता है कि आपको बहुत दुख होगा। मैंने यह रास्ता इसलिए अपनाया क्योंकि मैं बहुत गंदा हो चुका था अंदर से । मैं अपनी गंदी आदत को नहीं छुड़ा पाया। मुझे बहुत ज्यादा स्ट्रेस हो गया था। मुझे बार-बार अपने सर (अजीत पांडे) की याद आ रही थी। अच्छा एक बात बताइए कभी गलती हो जाए तो माफ नहीं किया जा सकता। मुझे ऐसा लगता है कि गलती माफ की जा सकती है।
मैं यह सब अजीत पांडे के कहने पर किया था। उस दिन मुझसे गलती हो गई थी, तो उन्होंने मुझे बहुत गंदी-गंदी गाली दी थी। सभी लड़कों को नीचे भेजकर मुझे बहुत बुरा-भला कहा था। मेरे मम्मी-पापा को भिखारी और भी बहुत बुरा-भला कहा। उन्होंने मुझसे कहा कि जहर खाकर मर जा या कहीं जाकर फांसी लगा ले।
मेरे भाई ने हमेशा मुझे सही रास्ता दिखाया। भाई ने मुझे हमेशा अच्छा ही समझाया। मेरी मां भी बहुत भोली है। मेरी गलती के बाद भी उसने मुझे कहा कि गलती तो सबसे हो जाती है। तुम अपना मन खराब मत करो। मेरे बाद पिताजी आप कभी शराब मत पीना।
अजीत पांडे ने ना जाने कितनों की जिंदगी बर्बाद कर दी। उसे गिरफ्तार करवा दीजिएगा। प्रिंसिपल और मेरे दोस्त आदित्य, अंशुल, सचिन को भी खबर पहुंचा दीजिएगा। मुझे माफ कर देना पापा।''
वडिलांचा आरोप - शिक्षकाने सर्वांपुढे मुलाचा अवमान केला
अमितचे वडील आल्हा यांनी आरोप केला की, मुलाला नवोदय स्कूलच्या शिक्षकाने सर्वांपुढे मारहाण व शिवीगाळ केली होती. माझा मुलगा परेशान झाला होता. अजीत पांडेने मुलाचा सर्वांपुढे अपमान केला. यामुळेच त्याने हे पाऊल उचलले.
ड्रॉइंग बॉक्स, वही, पैसे चोरले होते -शिक्षक
शिक्षक अजित पांडे या आरोपांवर म्हणाले - विद्यार्थ्याला 19 डिसेंबर रोजी चोरी करताना पकडण्यात आले होते. त्याच्यावर दुसऱ्या विद्यार्थ्यांनी चोरीचा आरोप केला होता. त्याने ड्रॉइंग बॉक्स, वही व काही पैसे चोरले होते. त्याच्या चौकशीत या प्रकाराची पुष्टी झाली. त्यानंर आम्ही त्याच्या पालकांना बोलावून व समजावून सांगून 20 डिसेंबर रोजी त्याला घरी पाठवले. आता मुलाने आत्महत्या का केली, हे माहिती नाही.
पोलिसांकडून सुसाइड नोटची तपासणी
ठाणे प्रभारी रामपूर नैकिन सुधांशु तिवारी यांनी सांगितले की, मुलाचा मृतदेह 2 जानेवारी रोजी त्याच्या घरी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. त्याच्याकडे एक सुसाइड नोटही आढळली आहे. त्याचा तपास केला जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.