आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Madras High Court Clarification On Capitation Fee Capitation Fee Is Not Donation, Income Tax Is Appropriate

मद्रास हायकोर्टाचा कॅपिटेशन शुल्कावर खुलासा:कॅपिटेशन शुल्क देणगी नाही, यावर प्राप्तिकर लावणे योग्य

चेन्नईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मद्रास हायकोर्टाने प्रवेशाच्या बदल्यात कॅपिटेशन शुल्क घेण्याची व्यवस्था संपुष्टात आणली. न्या. आर. महादेवन व न्या. मोहंमद शफिक यांचे पीठ म्हणाले, कॅपिटेशन शुल्क घेण्याची अशी प्रथा तामिळनाडू शैक्षणिक संस्था (कॅपिटेशन शुल्क वसूल करण्यास मनाई) अधिनियम, १९९२ च्या विरुद्ध आहे. शिक्षण संस्थांकडून घेतलेले कॅपिटेशन शुल्क देणगी किंवा स्वेच्छेने केलेले दान नाही. त्यावर प्राप्तिकर लावता येतो. तामिळनाडूत कॅपिटेशन शुल्कावर कर लावण्याच्या विरोधात दाखल एका शैक्षणिक व आरोग्य संस्थेसह ९ इतरांची याचिका आयकर अपिलीय ट्रिब्यूनलने योग्य ठरवली होती. हायकोर्ट म्हणाले, संस्थांनी जागा वाटपासाठी शुल्क वसूल केले.

जुनी प्रकरणे पुन्हा उघडा आयकर वसुलीचे आदेश पुढे चालवावेत, संबंधित संस्था व ट्रस्टना जारी सर्टिफिकेट रद्द करावेत, असे आदेश हायकोर्टाने अधिकाऱ्यांना दिले. यापूर्वी कॅपिटेशन शुल्क वसुलीचे ठोस पुरावे असतील आणि रीतसर परवानगी असेल तर जुने कर मूल्यांकन पुन्हा उघडावे.

बातम्या आणखी आहेत...