आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामद्रास उच्च न्यायालयाने एका प्रकरणात सुनावणी करताना तामिळनाडूतील सर्वच मंदिरांत मोबाइल वापरण्यास बंदी घालण्याचा निर्णय दिला आहे. कोर्ट म्हणाले - हा निर्णय मंदिरांची शुद्धता व पावित्र्य जपण्यासाठी घेण्यात आला आहे. भाविकांना त्रास होऊ नये म्हणून मंदिरांत फोन डिपॉझिट करण्यासाठी लॉकर्सची व्यवस्था केली जावी. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मंदिरात सुरक्षा रक्षकही तैनात केले जातील.
याचिकाकर्ता म्हणाला - मोबाइलमुळे भाविकांचे लक्ष्य विचलित होते
कोर्टाने हा आदेश एका याचिकेवर सुनावणी करताना दिला आहे. या याचिकेत सुब्रमण्यम स्वामी मंदिरात मोबाइलवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. मोबाइलमुळे भाविकांचे लक्ष्य विचलित होते. मंदिरात देवांचे फोटो काढणेही परंपरेच्या विरोधात आहे, असे या याचिकेत नमूद करण्यात आले होते.
तिरुचेंदुर स्थित मंदिर प्राधिकरणाने मोबाइलवर बंदी घालण्यासह सन्मानजनक ड्रेस कोड लागू करण्याचे पाऊल उचलले आहे, अशी बाब याचिकाकर्त्याने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर कोर्टाने संपूर्ण तामिळनाडूत असे करण्याचे आदेश दिले.
विनापरवानगी काढले जातात महिलांचे फोटो
फोटोग्राफीमुळे मंदिराची सुरक्षा संकटात सापडले. विशेषतः महिलांचे फोटोही त्यांच्या परवानगीशिवाय काढली जातात. यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरते, असेही या याचिकेत नमूद करण्यात आले होते. तसेच सन्मानजनक ड्रेस कोड लागू करण्याची मागणीही केली होती. दरम्यान, केरळच्या गुरुवयुर स्थित श्रीकृष्ण मंदिर व तामिळनाडूच्या तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरात पूर्वीपासूनच मोबाइल फोनवर बंदी घालण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.