आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम मंदिर भूमिपूजन:भूमिपूजनाला हजर राहून माेदी, भागवत यांनी केले संविधानाचे उल्लंघन, भाकपची जाेरदार टीका

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदींनी माेहन भागवत व याेगी आदित्यनाथ यांच्यासाेबत भूमिपूजन करून संघ परिवाराचा हिंदूू राष्ट्र अजेंडा पूर्ण केला

अयाेध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन समारंभात पंतप्रधान नरेंद्र माेदींसह सरसंघचालक माेहन भागवत यांची उपस्थिती संविधानाचे उल्लंघन व धर्मनिरपेक्ष राज्याच्या सिद्धांताविराेधात आहे, अशी टीका भाकपचे सरचिटणीस डाॅ. डी. राजा यांनी गुरुवारी केली.

राजा म्हणाले, २०१४ मध्ये भाजप सत्तेवर आल्यापासून नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाखाली संघाचा अजेंडा राबवला जात आहे. आधी त्यांनी जम्मू-काश्मीरचे विभाजन केले. सध्या लाेक तुरुंगात आहेत. बुधवारी त्यांनी माेहन भागवत व याेगी आदित्यनाथ यांच्यासाेबत भूमिपूजन करून संघ परिवाराचा हिंदूू राष्ट्र अजेंडा पूर्ण केला.भारतीय संविधान स्पष्ट आहे. आपला देश एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. सर्व धर्माविषयी नि:पक्ष असले पाहिजे, परंतु अयाेध्येत दिसून आलेल्या दृश्यावरून संघ परिवाराने भूमिपूजन समारंभाला हिंदू राष्ट्र म्हणून स्थापित करण्याचा प्रयत्न केला. आता ते त्याला रामराज्य अशी संज्ञाही देतील, असा आराेप राजा यांनी केला. देशात ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे परिस्थिती बिकट झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...