आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार कम्युनिस्टविराेधी असल्याचा बहाणा:विजयन यांची राजकीय उंची कमी हाेऊ नये म्हणून मॅगसेसेला नकार

के. ए. शाजी | तिरुवनंतपुरमएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मॅगसेसेने डावे आंदाेलन चिरडले हाेते : माकप

केरळच्या माजी आराेग्यमंत्री के. के. शैलजा यांनी रेमन मॅगसेसे पुरस्कार नाकारला. त्यावरून राज्यात राजकारण तापू लागले आहे. परंतु फिलिपाइन्स नेते रेमन मॅगसेसे यांनी अमेरिकेच्या सीआयएच्या मदतीने डाव्यांचे आंदाेलन दडपून टाकले हाेते. त्यामुळे शैलजा यांनी हा सन्मान स्वीकारलेला नाही, अशी प्रतिक्रिया माकपने दिली हाेती. परंतु राजकीय विश्लेषकांचे मत वेगळे आहे.

शैलजा यांची राजकीय उंची मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यापेक्षा वाढू नये, अशी माकप नेत्यांची इच्छा आहे. काेराेनाकाळात शैलजा यांनी केलेल्या कामाचे काैतुक झाले हाेते. परंतु पक्ष पुन्हा सत्तेवर आल्यानंतर शैलजा यांना मंत्रिपद दिले गेले नाही. तेव्हाही विजयन यांचा प्रभाव राखण्यासाठी पक्षाने शैलजा यांचा बळी दिल्याचे मानले गेले. माकपमधून हकालपट्टी झालेले व तत्कालीन मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन यांचे माजी खासगी सचिव के. एन. शाहजहां ‘भास्कर’शी बोलताना म्हणाले, मॅगसेसे कम्युनिस्टविराेधी असल्यामुळे शैलजा यांना पुरस्कार घेऊ दिला नाही. मग विजयन यांना हा पुरस्कार जाहीर झाला असता तर माकप हेच करणार हाेता का? उत्तर हाे असल्यास कम्युनिस्टविराेधी साेराेसद्वारा स्थापन संस्थेकडून विजयन यांनी गाैरव का स्वीकारला हाेता? म्हणजे विजयन यांच्यासाठी हे मापदंड लागू हाेत नाहीत.

थाेडक्यात पक्ष शैलजा यांना पडद्यामागे ठेवू इच्छिते, हे स्पष्ट आहे. डावे विचारवंत डाॅ. आझाद मलायित्तल म्हणाले, विजयन दाेन वर्षांपूर्वी लंडन येथील स्टाॅक एक्स्चेंजच्या लिस्टिंग समारंभात सहभागी झाले हाेते तेव्हा माकपचे नियम काेठे गेले हाेते? स्टाॅक एक्स्चेंज हे भांडवलदारीचे माेठे प्रतीक ठरते.

माकप : हे यश वैयक्तिक नाही

पक्षाचे सरचिटणीस सीताराम येच्युरी म्हणाले, जनतेच्या आराेग्यासाठी शैलजा यांनी केलेली यशस्वी कामगिरी वैयक्तिक स्वरूपाची नाही. हे यश केरळ सरकार, आराेग्य मंत्रालयातील सर्व लाेकांचे संयुक्त असे यश ठरते. त्यासाठी एखाद्या व्यक्तीला श्रेय देता येणार नाही. दुसरे म्हणजे पुरस्कार काेणत्याही सक्रिय व्यक्तीला दिला गेला नाही. शैलजा माकपच्या केंद्रीय समितीच्या सदस्या आहेत. ही पक्षाची निर्णय घेणारी सर्वाेच्च संस्था आहे.

मॅगसेसे मिळालेल्यांचा अपमान नाही : शैलजा

भारतात मॅगसेसे मिळवणाऱ्यांचा माझ्या कृतीने अपमान केेलेला नाही. परंतु मी कम्युनिस्ट पार्टी व केंद्रीय समितीचे प्रतिनिधित्व करते. म्हणून हा पुरस्कार स्वीकारला नाही, असे शैलजा यांनी स्पष्ट केले..

बातम्या आणखी आहेत...