आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्तीसगडच्या एका न्यायालयात शुक्रवारी चक्क महादेवाची पेशी झाली. होय, तुम्ही बरोबर ऐकले. रायगड महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कारनाम्यामुळे हा अजब प्रकार घडला. प्रथम तर अधिकाऱ्यांनी महादेवाला आरोपी म्हणून न्यायालयात हजर राहण्याची नोटीस जारी केली. त्यानंतर सुनावणीस गैरहजर राहिल्यास 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा इशाराही दिला.
आता देव स्वतः तर न्यायालयात येऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या भक्तांनी म्हणजे स्थानिक नागरिकांनी महादेवाची पिंड उपटून न्यायालयात हजर केली. पण, त्यानंतरही देवाला दिलासा मिळाला नाही. कारण, तहसीलदार गैरहजर असल्यामुळे न्यायालयाने त्यांना पुढील तारीख दिली.
रायगडमधील काही भूखंड अवैधपणे बळकावल्याप्रकरणी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी रायगड तहसील कोर्टाने 23 ते 24 फेब्रुवारी व 2 मार्च रोजी सीमांकन पथकाद्वारे कौहाकुंडा गावात तपास केला होता. त्यात अनेक लोकांनी अवैध ताबा मिळवल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर न्यायालयाने 10 जणांना नोटीस जारी केली. त्यात न्यायालयात गैरहजर राहणाऱ्यांना 0 हजार रुपयांच्या दंडासह बेदखल करण्याचा इशारा देण्यात आला. होता. या नोटीसीद्वारे वादग्रस्त भूखंडांवर बांधकाम करण्यासही मनाई करण्यात आली होती.
कोर्टाने महादेव मंदिरासह 10 जणांना बजावली होती नोटीस
या प्रकरणी शुक्रवारी सुनावणी होणार होती. कोर्टाने नोटीस जारी केलेल्या 10 जणांत कोहाकुंडातील महादेव मंदिराचाही समावेश होता. या प्रकरणी एखाद्या पुजाऱ्याचे नाव नसल्यामुळे थेट देवालाच नोटीस बजावण्यात आली. सुनावणीस गैरहजर असणाऱ्यांना 10 हजारांचा दंड ठोठावण्यात येणार असल्यामुळे स्थानिकांनी मंदिरातील शिवलिंगच कोर्टात हजर केले.
महादेवांना मिळाली नवी तारीख
स्थानिक शिवलिंग घेऊन कोर्टात पोहोचले. पण, तिथे बाहेर एक नोटीस लावण्यात आली होती. पीठासीन अधिकारी अन्य काही कामांत व्यस्त असल्यामुळे या प्रकरणाची सुनावणी 13 एप्रिलपर्यंत स्थगित करण्याची माहिती या नोटीसीत नमूद करण्यात आली होती. त्यामुळे स्थानिकांना आल्यापावली परत जावे लागले.
तहसीलदार म्हणाले, चूक झाली
तहसीलदार गगन शर्मा यांनी या प्रकरणी आपल्याला काहीच कल्पना नसल्याचे स्पष्ट केले आहे. सदर नोटीस नायब तहसीलदारांनी जारी केली होती. त्यात काही त्रुटी असेल तर त्यात सुधारणा केली जाईल, असे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.