आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउज्जैनच्या महाकाल मंदिरात पुन्हा एकदा चित्रपटाच्या गाण्यावर डान्सचा व्हिडिओ तयार केल्याची घटना उजेडात आली आहे. यावेळी हे काम भाविकांनी नव्हे तर मंदिरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनीच केले आहे.
या घटनेचा VIDEO उजेडात आल्यानंतर सुरक्षा एजेंसीने दोन्ही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच मंदिरात तैनात कर्मचाऱ्यांवर स्मार्टफोन बाळगण्यावर बंदीही घातली आहे. मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी KSS कंपनीकडे आहे. याच कंपनीच्या 2 महिला कर्मचाऱ्यांनी डान्सचा व्हिडिओ तयार केला आहे.
प्रथम पाहूया VIDEOमध्ये काय आहे?
मंदिर परिसरात व्हिडिओ तयार करणाऱ्या 2 महिला कर्मचाऱ्यांवर सुरक्षा एजंसीने निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी स्मार्टफोन बाळगू नये, असेही स्पष्ट केले आहे.
मंदिर परिसरात डान्स करण्याचे उजेडात आलेले दोन्ही व्हिडिओ महाकाल मंदिराच्या विश्रामधाम कॅम्पसचे आहेत. तिथे सुरक्षा कर्मचारी वर्षा नवरंग व पूनम सेन चित्रपटाच्या गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहेत.
14 व 9 सेकंदांच्या या 2 पैकी एका व्हिडिओत 1988 साली आलेल्या 'खून भरी मांग' या चित्रपटातील 'जीने के बहाने लाखों हैं, जीना तुझको आया ही नहीं' हे गाणे ऐकावसाय येत आहे. तर दुसऱ्यात 1997मध्ये आलेल्या 'जुदाई' चित्रपटातील - प्यार करते-करते, तुम पे मरते-मरते... दिल दे दिया...हे गाणे ऐकावयास येत आहे.
मंदिर परिसरात 3 शिफ्टमध्ये 75 कर्मचारी
श्रीमहाकालेश्वर मंदिर व महाकाल लोकमध्ये सुरक्षा एजंसीचे 390 कर्मचारी तैनात आहेत. ते 3 शिफ्टमध्ये काम करतात. प्रत्येक शिफ्टमध्ये जवळपास 75 महिला व पुरुष कर्मचारी तैनात असतात. यापैकी अनेक कर्मचारी नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करतात.
KSS कंपनीचे सुरक्षा मॅनेजर जितेंद्र चावरे यांनी सांगितले की, सर्वच कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना स्मार्टफोन न बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यांना की-पॅडचा मोबाइल वापरता येील. कर्मचाऱ्यांना मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ शूट न करण्याचीही तंबी देण्यात आली आहे.
यापूर्वीही अनेकदा महाकाल परिसरात चित्रपटाच्या गाण्यांवर व्हिडिओ तयार करण्याच्या घटना उजेडात आल्या होत्या. पण सुरक्षा रक्षकांनीच असे कृत्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वीच्या 5 घटनांप्रकरणी मंदिर प्रशासनाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.