आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रयागराजमधील भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मृतदेह अल्लापूरमधील बाघंबरी गद्दी मठाच्या खोलीत लटकलेला आढळला. तपास केला जात आहे. शवविच्छेदनानंतरच घटनेचे कारण स्पष्ट होईल. आयजी रेंज केपी सिंह यांनी सांगितले की ते घटनास्थळी पोहोचले आहेत. सध्या फाशी घेऊन आत्महत्या केल्याचे प्रकरण दिसते. फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. मोठ्या संख्येने भक्त आणि भाविकही मठात पोहोचले आहेत.
घटनास्थळी पोहचलेल्या अधिकाऱ्यांच्या मते, नरेंद्र गिरी यांनी ज्या खोलीत आत्महत्या केली आहे. तो दरवाजा बंद होता, अनुयायांच्या माहितीवरून नरेंद्र गिरींचा मृतदेह दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आला. घटनास्थळावरून एक सुसाईड नोट सापडली. सल्फास खाण्याविषयी जे समोर येत आहे, ते शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल.
मृत्यूपत्राप्रमाणे लिहिली आहे सुसाइड नोट
आयजी केपी सिंह यांनी सांगितले की त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे, ज्यात शिष्य आनंद गिरी यांचाही उल्लेख आहे. नरेंद्र गिरी यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये कोणत्या शिष्याला काय द्यायचे आहे? किती द्यायचे, या सर्वांचाही उल्लेख केला आहे. सुसाईड नोटमध्ये असेही लिहिले आहे की ते त्यांच्या काही शिष्यांच्या वागण्याने खूप दुखावले आहेत आणि म्हणूनच ते आत्महत्या करत आहे.
कालच उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांनी घेतला होता आशीर्वाद
एक दिवस आधी रविवारी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य प्रयागराजमध्ये होते. त्यानंतर त्यांनी मंदिरात जाऊन महंत नरेंद्र गिरी यांचे आशीर्वाद घेतले. अलीकडेच, प्रयागराज येथे आलेले डीजीपी मुकुल गोयल देखील हनुमान जी मंदिरात पूजा करण्यासाठी गेले होते.
महंत नरेंद्र गिरी गेल्या दोन दशकांपासून साधु-संतांमध्ये महत्त्वाच्या स्थानावर होते. प्रयागराज येथे आगमन झाल्यावर, मोठे नेते असोत किंवा उच्च पोलिस-प्रशासकीय अधिकारी असो, ते महंतांकडून आशीर्वाद घेण्यासाठी लेटे हनुमान जीच्या दर्शनासाठी अवश्य जात होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही बांघबरी मठात जात असत.
काही काळापासून शिष्यासोबक महेंद्र यांचा सुरु होता वाद
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी आणि त्यांचे शिष्य आनंद गिरी यांच्यात बराच काळापासून वाद होता, पण नंतर त्यांनी एक करार केला होता. त्यानंतर हरिद्वारहून प्रयागराजला पोहोचलेल्या आनंद गिरी यांनी त्यांचे गुरु स्वामी नरेंद्र गिरी यांच्या पाया पडून माफी मागितली.
आनंद म्हणाले होते - मी माझ्या कृत्याबद्दल पंच परमेश्वराचीही माफी मागतो आहे. मी सोशल मीडिया, वर्तमानपत्रे, टीव्ही चॅनल्सवर माझ्याकडून जी काही विधाने जारी केली आहेत ती मी परत घेतो. यानंतर महंत नरेंद्र गिरी यांनीही आनंद गिरी यांच्यावरील आरोप मागे घेऊन त्यांना माफ केले.
यानंतर आखाडा परिषदेने केला होता हस्तक्षेप
अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या हस्तक्षेपानंतर हा वाद तूर्तास शांत करण्यात आला होता. यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आनंद गिरी आखाड्यात आपल्या गुरूची पूजा करू शकले होते. आखाडा आणि मठात आनंदा गिरीच्या प्रवेशावर लावलेली बंदी काढून टाकण्यात आली. मात्र, आनंद गिरी यांची आखाड्यातून हकालपट्टी मागे घेण्यात आली की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.