आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र गिरी यांना आज अंतिम निरोप:महंत नरेंद्र गिरी यांना एका सीडीवरून ब्लॅकमेल केले जात होते; या प्रकरणाच्या CBI तपासासाठी उच्च न्यायालयात अर्ज

प्रयागराज4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष आणि निरंजनी आखाड्याचे सचिव महंत नरेंद्र गिरी (70) यांचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत सोमवारी संध्याकाळी प्रयागराजमध्ये आढळून आला. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी, त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी बाघंबरी मठात ठेवण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार नरेंद्र गिरी यांना ब्लॅकमेल केले जात होते. त्यांच्या एका व्हिडिओची सीडी तयार करण्यात आली होती. पोलिसांनी ही सीडीही जप्त केली आहे. नरेंद्र गिरी यांच्या शिष्यांचा असा दावा आहे की महंत नरेंद्र गिरी यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी एक कबुलीजबाब व्हिडिओही बनवला होता.

दुसरीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाघंबरी मठात पोहोचून नरेंद्र गिरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले की, ही एक दुःखद घटना आहे. म्हणूनच मी त्यांना वैयक्तिकरित्या माझ्या संत समाजाच्या वतीने आणि राज्य सरकारच्या वतीने त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित आहे. हे आपल्या समाजाचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. त्यांनी संत समाजाची केलेली सेवा अविस्मरणीय आहे.

अपडेट्स...

  • अलाहाबाद उच्च न्यायालयात महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्ते वकील सुनील चौधरी यांनी प्रयागराजचे डीएम आणि एसएसपी यांना तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
  • खासदार रीता बहुगुणा जोशीही प्रयागराजला पोहोचल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, हे एका संताच्या आत्महत्येचे प्रकरण आहे. त्याच्या तळाशी जाऊ, यामागे कोण लोक आहेत, कोण दोषी आहेत हे शोधण्यासाठी कारवाई झाली पाहिजे.

नरेंद्र गिरी यांचे शिष्य आनंद गिरी यांच्याविरोधात एफआयआर दाखल
नरेंद्र गिरीच्या संशयास्पद मृत्यूमध्ये, जॉर्जटाउन पोलीस ठाण्यात त्यांचा शिष्य आनंद गिरी (45) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लेटे हनुमान मंदिराचे प्रशासक अमर गिरी यांच्या वतीने एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आनंदच्या छळामुळे महंत नरेंद्र गिरी यांनी आत्महत्या केल्याचे आरोप आहेत.

आनंद गिरीला उत्तराखंड पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी अटक केली. सायंकाळी उशिरा सहारनपूर पोलिस आणि एसओजीची टीम यूपीहून हरिद्वारच्या आश्रमात पोहोचली आणि सुमारे दीड तासांच्या चौकशीनंतर आनंद गिरीला अटक केली. दुसरीकडे, आनंद गिरी यांनी ते निर्दोष असल्याचे सांगत याला मोठे षड्यंत्र म्हटले आहे. आनंद यांनी सीएम योगी यांच्याकडे निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले आहे की, मी तपासात प्रत्येक सहकार्यासाठी तयार आहे. त्याचवेळी पोलिसांनी लेटे हनुमान मंदिराचे पुजारी आद्या तिवारी आणि त्यांचा मुलगा संदीप तिवारी यांना प्रयागराज येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...