आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mahapanchayat Today In UP; 5 Lakh Farmers Will Come, The Organizers Claim, Ten Thousand Volunteers Will Be Active

भास्कर ग्राउंड रिपोर्ट:यूपीत आज महापंचायत; 5 लाख शेतकरी येणार, आयाेजकांचा दावा, दहा हजार स्वयंसेवक सक्रिय असणार

मुजफ्फरनगरहून एम. रियाझ हाश्मी19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त किसान मोर्चा गेल्या ९ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला उत्तर प्रदेशात नवी धार देण्याची तयारी करत आहे. ५ सप्टेंबर म्हणजेच रविवारी मुज्जफरनगरमध्ये शेतकऱ्यांची पहिली महापंचायत होणार आहे. हे आयोजन एेतिहासिक व्हावे यासाठी तयारी केली जात आहे. त्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रविवारच्या महापंचायतला देशभरातून ५ लाखांहून जास्त शेतकरी येतील, असा दावा आयोजकांनी केला होता. महापंचायत आतापर्यंत सर्वात मोठी सभा ठरेल, असा प्रचार केला जात आहे. शासन तसेच प्रशासनाच्या पातळीवर कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता स्पष्ट दिसू लागली आहे. भोजनापासून निवासापर्यंत आणि सुमारे ३ लाख वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. संघटनेचे १० हजार स्वयंसेवक तैनात केले जाणार आहेत. राज्यातील निवडणुकीच्या सहा महिने अगोदर शेतकरी आंदोलनाची रोख उत्तर प्रदेशच्या दिशेने का वळवण्यात आला हा सर्वात मोठा प्रश्न ठरतो. संघटनेचे नेते राकेश टिकैत यांनी आपल्या भाषणातून उत्तर प्रदेशात शेतकरी आंदोलनाला फारशी धार नव्हती, असे वारंवार सांगितले आहे. कारण कृषी कायद्याच्या विरोधात हरियाणा, पंजाब, राजस्थानात आंदोलन चांगले झाले. दिल्ली-यूपी सीमेवर गाझीपूर हा तेवढा अपवाद ठरला. परंतु यूपीत तसे आंदाेलन झाले नसल्याचे टिकैत यांना वाटत होते. नरेश व राकेश टिकैत बंधूंवर याबाबत आरोप होत आहेत. पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर भाजपवर कोणते आैषध लागू पडेल हे कळाले आहे, असे टिकैत यांनी वेळोवेळी भाषणातून सांगितले. शेतकरी याच आैषधीने उपचार करणार आहेत. पश्चिम उत्तर प्रदेश हा साखरपट्टा म्हणून आेळखला जातो. परंतु त्यांना ऊसउत्पादकांना त्यांची थकबाकी मिळालेली नाही. त्यावर कहर म्हणजे ऑक्टोबरपासून साखर कारखान्यांत नवा गळीत हंगाम सुरू होणार आहे. निवडणुकीचे वारे वाहत असताना राज्य सरकारला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडे दबावाचे राजकारण करण्याची ही योग्य वेळ आहे. म्हणूनच महापंचायतचे आयोजन अनेक अर्थाने महत्त्वाचे ठरते. यातून पश्चिम उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणावर परिणाम झाल्याचे दिसून येईल. २०२२ च्या उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पिकांचे बीजारोपण महापंचायतच्या निमित्ताने शेतकरी करू शकतात. त्यामुळेच राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. २०१७ च्या विधानसभा व गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत भाजपकडून दारुण पराभव झालेले विरोधी पक्ष शेतकरी आंदोलनाची जणू ढाल बनल्याचे दिसते. त्यातूनच ते भाजपला घेरण्याची एकही संधी दवडत नाहीत.

महाराष्ट्रासह देशभरातील शेतकरी सहभागी होणार : टिकैत
चौधरी अजितसिंह यांचे पुत्र जयंत चौधरी यांना सध्याची परिस्थिती अपनी पार्टीसाठी सुवर्णकाळासारखी वाटू लागली आहे. मुजफ्फरनगरच्या सर्क्युलर रोडवर गेल्या काही दिवसांपासून आयोजनाच्या पूर्वतयारीची लगबग दिसून येत आहे. जीआयसीच्या मैदानावर महापंचायत होईल. येथे शेतकरी नेत्यांची ये-जा चोवीस तास सुरू आहे. महाराष्ट्र, बिहार, बंगाल, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, मध्य प्रदेश, गुजरातहून शेतकरी सहभागी होतील, असे राकेश टिकैत यांचे पुत्र गौरव टिकैत यांनी म्हटले आहे.

याबाबत आरोप होत आहेत. पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर भाजपवर कोणते आैषध लागू पडेल हे कळाले आहे, असे टिकैत यांनी वेळोवेळी भाषणातून सांगितले. शेतकरी याच आैषधीने उपचार करणार आहेत. पश्चिम उत्तर प्रदेश हा साखरपट्टा म्हणून आेळखला जातो. परंतु त्यांना ऊसउत्पादकांना त्यांची थकबाकी मिळालेली नाही. त्यावर कहर म्हणजे ऑक्टोबरपासून साखर कारखान्यांत नवा गळीत हंगाम सुरू होणार आहे. निवडणुकीचे वारे वाहत असताना राज्य सरकारला अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडे दबावाचे राजकारण करण्याची ही योग्य वेळ आहे. म्हणूनच महापंचायतचे आयोजन अनेक अर्थाने महत्त्वाचे ठरते. यातून पश्चिम उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणावर परिणाम झाल्याचे दिसून येईल. २०२२ च्या उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पिकांचे बीजारोपण महापंचायतच्या निमित्ताने शेतकरी करू शकतात. त्यामुळेच राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. २०१७ च्या विधानसभा व गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत भाजपकडून दारुण पराभव झालेले विरोधी पक्ष शेतकरी आंदोलनाची जणू ढाल बनल्याचे दिसते. त्यातूनच ते भाजपला घेरण्याची एकही संधी दवडत नाहीत.

बातम्या आणखी आहेत...