आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Maharashtra Bypoll Result 2023; Arunachal Pradesh Election Result | MVA Candidates | Tamil Nadu | Ravindra Dhangekar

5 राज्यांतील विधानसभेच्या 6 पैकी 2 जागा काँग्रेसला:महाराष्ट्रातील कसबा पेठसह बंगालच्या सागरदीघी मतदार संघात काँग्रेसचा विजय

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र हेमराज धंगेकर यांनी कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीतील विजयाचे प्रमाणपत्र घेताना.

ईशान्य भारतातील 3 राज्यांतील विधानसभा निवडणुकीसह आज 5 राज्यांतील 6 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यात काँग्रेसने 2 जागा आपल्या खिशात घातल्या आहेत. महाराष्ट्रातील कसबा पेठ मतदार संघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. ही जागा 1995 पासून भाजपच्या ताब्यात होती.

दुसरीकडे, बंगालमध्येही काँग्रेसचे खाते उघडले आहे. काँग्रेस उमेदवार बेरॉन बिस्वास यांचा सागरदीघी मतदार संघात विजय झाला आहे. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बंगालमध्ये भोपळाही फोडता आला नव्हता. अरुणाचल प्रदेशात BJP च्या त्सेरिंग ल्हामू या बिनविरोध विजय झाला आहे.

तामिळनाडूच्या ईरोड मतदार संघात काँग्रेस उमेदवार एलंगोव्हन यांचा विजय झाला आहे. तर अरुणाचल प्रदेशात भाजपच्या त्सेरिंग ल्हामू या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

अरुणाचल, झारखंड, तामिळनाडू व पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एका, तर महाराष्ट्रात 2 जागांवर पोटनिवडणूक झाली होती. ही निवडणूक 26 व 27 फेब्रुवारी रोजी झाली होती. याशिवाय लक्षद्विपच्याही संसदीय क्षेत्रातही 27 फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक झाली होती.

महाराष्ट्र : कसब्यात काँग्रेस , चिंचवडमध्ये भाजप विजयी

कसबा मतदार संघात काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे.
कसबा मतदार संघात काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे.

महाराष्ट्रातील कसबा पेठ व चिंचवडमध्ये गत 26 फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक झाली होती. या दोन्ही जागा भाजप आमदार मुक्ता टिळक व लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झाल्या होत्या. भाजपने चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली होती. त्यांचा याठिकाणी विजय झाला आहे. दुसरीकडे कसबा पेठमध्ये काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. त्यांनी त्यांचे भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला आहे.

तामिळनाडू : ईरोड मतदार संघात एलंगोव्हन यांचा 33375 मतांनी विजय

एलंगोव्हन यांनी आघाडी घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा करणे सुरू केले आहे.
एलंगोव्हन यांनी आघाडी घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा करणे सुरू केले आहे.

काँग्रेसने ईरोड मतदार संघात एलंगोव्हन यांना उमदेवारी दिली होती. त्यांनी पहिल्या फेरीपासूनच अण्णाद्रमुकचे आपले प्रतिस्पर्धी उमेदवार एस थेनारासु यांच्यावर आघाडी घेतली होती. अखेर त्यांनी त्यांचा 33375 मतांनी पराभव केला. या ठिकाणी जवळपास 77 उमेदवार मैदानात होते.

झारखंड : रामगड मतदार संघात सुनीता चौधरी 21709 मतांनी आघाडीवर

रामगड मतदार संघातील काँग्रेस आमदार ममता देवी एका फौजदारी गुन्ह्यामुळे अपात्र ठरल्या होत्या. त्यामुळे पक्षाने या जागेवर त्यांचे पती बजरंग महतो यांना उमेदवारी दिली होती. भाजप - AJSU ने सुनीता चौधरी यांना उमेदवारी दिली होती.

येथे एकूण 18 उमेदवार मैदानात आहेत. मतमोजणी 120 कर्मचारी 40 टेबलवर करत आहेत. ती 11 फेऱ्या चालेल. सध्या येथे सुनीता चौधरी 21709 मतांनी आघाडीवर आहेत.

सुनीता चौधरी व बजरंग महतो.
सुनीता चौधरी व बजरंग महतो.

पश्चिम बंगाल : सागरदीघी सीटवर बेरॉन बिस्वास 22434 मतांनी विजय

ही जागा टीएमसीचे आमदार सुब्रत साहा यांच्या निधनानंतर डिसेंबर 2022 मध्ये रिक्त झाली होती. येथे तृणमूल काँग्रेसचे देबाशिष बॅनर्जी, भाजपचे दिलीप साहा व विरोधक पुरस्कृत काँग्रेसचे बॅरन बिस्वास यांच्यात लढत होती. त्यात बेरॉन बिस्वास 22434 मतांनी विजयी झाले. 2021 च्या निवडणुकीत काँग्रेसला बंगालमध्ये एकही जागा मिळाली नव्हती. त्यामुळे सागरदीघी जागेवरील विजय काँग्रेससाठी पुनरागमन असल्याचे मानले जात आहे.

अरुणाचल प्रदेश : भाजपचा बिनविरोध विजय

त्सेरिंग ल्हामू यांनी गुरुवारी आमदारकीची शपथ घेतली.
त्सेरिंग ल्हामू यांनी गुरुवारी आमदारकीची शपथ घेतली.

अरुणाचल प्रदेशातील लुमला सीट भाजपचे जम्बे ताशी यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती. त्यानंतर भाजपने तेसरिंग ल्हामु यांना येथे उमेदवारी दिली. याठिकाणी अन्य उमेदवार नसल्यामुळे भाजपचा या ठिकाणी बिनविरोध विजय झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...