आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीआयचे नवे संचालक:महाराष्ट्र केडरचे आयपीएस सुबोध कुमार जायसवाल सीबीआयच्या संचालकपदी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील 3सदस्यीय पॅनलने या नियुक्तीला मंजुरी दिली

भारतीय पोलिस सेवेचे (आयपीएस) अधिकारी सुबोधकुमार जायसवाल यांची मंगळवारी सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती झाली. त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल.

सध्या सीआयएसफ महासंचालक जायसवाल महाराष्ट्र केडर १९८५ च्या बॅचचे आयपीएस आहेत. तसेच ते महाराष्ट्राचे पाेलिस महासंचालकही राहिलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील ३ सदस्यीय पॅनलने या नियुक्तीला मंजुरी दिली. सूत्रांनुसार, यंदा सीबीआय संचालकपदाच्या शर्यतीत मोदी सरकारचे दोन ‘खास अधिकारी’ राकेश अस्थाना व वाय.सी. मोदी सर्वात पुढे दिसत होते. पॅनलच्या बैठकीत सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी मागील एक नियम सांगितला. त्या आधारे अस्थाना व वाय.सी. मोदी शर्यतीतून बाहेर झाले. सरन्यायाधीशांनी मार्च २०१९ च्या प्रकाशसिंह प्रकरणाचा हवाला दिला. ज्या अधिकाऱ्याचा कार्यकाळ ६ महिन्यांपेक्षा कमी उरला असेल त्याला ‘पोलिस प्रमुख’ बनवू शकत नाही, असे त्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...