आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Maharashtra Congress Leader Naseem Khan's Demand To The President Mulayam Singh Yadav Should Be Awarded Bharat Ratna

मुलायम सिंह यादव यांना भारतरत्न द्या:महाराष्ट्र काँग्रेस नेते नसीम खान यांची राष्ट्रपतींकडे मागणी, म्हणाले - योगदानासाठी पुरस्काराने सन्मानित करावे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मुलायमसिंह यादव यांना केंद्राने भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान बहाल करावा, अशी मागणी महाराष्ट्रातील ज्येष्ठ काँग्रेस नेते नसीम खान यांनी सोमवारी केली. यासंदर्भात नसीम खान यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. यापुर्वी सपाचे प्रवक्ते आयपी सिंह यांनीही मुलायम सिंह यादव यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती.

मुलायम सिंह यांचे नुकतचे निधन झाले आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणात ते 'नेताजी' या नावाने ओळखले जायचे. त्यांचे देशाच्या राजकारणात मोठे योगदान आहे. आता मुलायम सिंह यादव यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात येत आहे.

समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव आपला मुलगा अखिलेश यादव यांच्यासोबत.
समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव आपला मुलगा अखिलेश यादव यांच्यासोबत.

खान म्हणाले की, उत्तर प्रदेशातील सैफई या छोट्या गावात एका मागासलेल्या कुटुंबात जन्माला येऊनही यादव हे सहा दशकांहून अधिक काळ राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले. प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात त्यांनी समाजातील सर्व घटकांसाठी काम केले. ते 8 वेळा आमदार म्हणून निवडून आले, त्यांनी 7 वेळा खासदार, तीन वेळा यूपीचे मुख्यमंत्री आणि एकदा देशाचे संरक्षण मंत्री म्हणून काम केले. त्यांचे संपूर्ण जीवन समाजातील गरीब, दलित, अल्पसंख्याकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्ष परंपरा टिकवून ठेवण्याच्या संघर्षात होते.

पुढे ते म्हणाले की, यादव यांच्या निधनामुळे देशभरात विशेषत: समाजवादी आणि धर्मनिरपेक्षतावाद्यांमध्ये शोककळा पसरली होती. आता सरकारने त्यांना मरणोत्तर भारतरत्न देऊन त्यांचे योगदानाचा सन्मान करावा.

मुलायम सिंह यादव यांचे 10 ऑक्टोंबर 2022 रोजी निधन

समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचे 10 ऑक्टोंबर 2022 रोजी निधन झाले. 82 वर्षीय मुलायम सिंह यांना युरिन इन्फेक्शनमुळे 26 सप्टेंबरपासून गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षाच्या ट्विटर हँडलवर मुलायम यांच्या निधनाची माहिती दिली. 22 नोव्हेंबर 1939 रोजी सैफई येथे जन्म झालेल्या मुलायमसिंह यादव यांचे शिक्षण इटावा, फतेहाबाद आणि आग्रा येथे झाले. मुलायम काही दिवस मैनपुरीतील करहल येथील जैन इंटर कॉलेजमध्येही प्राध्यापक होते. पाच भावंडांपैकी दुसरे असलेले मुलायम सिंह यांनी दोन विवाह केले होते. त्यांची पहिली पत्नी मालती देवी यांचे मे 2003 मध्ये निधन झाले. अखिलेश यादव हे मुलायम यांच्या पहिल्या पत्नीचे पुत्र आहेत. त्यांच्या निधनावर राजकीय क्षेत्रापासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनी शोक व्यक्त केला आहे. येथे वाचा पुर्ण बातमी

अखिलेश यांनी दिला मुखाग्नी

समाजवादी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मुलायम सिंह यादव (नेताजी) यांच्यावर मंगळवारी म्हणजेच 11 ऑक्टोंबर रोजी दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. नेताजी यांचा मुलगा तथा सपाचे नेते अखिलेश यादव यांनी सैफई येथील यात्रा मैदानावर मुलायम सिंह यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. शासकीय इतमामात झालेल्या या अंत्यसंस्कार सोहळ्यास अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री अंत्यदर्शनासाठी पोहोचले होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही श्रद्धांजली वाहिली. अमिताभ बच्चन यांचा मुलगा तथा अभिनेता अभिषेक बच्चन, पत्नी जया बच्चन आणि उद्योगपती अनिल अंबानी हे देखील मुलायम सिंह यांच्या जवळचे मानले जात असत. ही सर्व मंडळी सद्यस्थितीत अंत्यसंस्कार सोहळ्यात सहभागी झाली होती. येथे वाचा पुर्ण बातमी

25 फोटोंमध्ये मुलायम सिंह यांचा प्रवास

समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचे सोमवारी निधन झाले. प्रथम कुस्ती, नंतर प्राध्यापक म्हणून केलेले मुलायम सिंह यादव यांनी जीवनात अनेक अडचणींना सामना केला. ते अनेक पक्षांमध्ये सहभागी झाले अनेक बड्या नेत्यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले. त्यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष काढला आणि एक-दोनदा नव्हे तर तब्बल तीनदा यूपीमध्ये सत्ता काबीज केली. युपीचे राजकारण ज्या धर्म आणि जातीच्या प्रयोगशाळेतून जात होते. त्या अभिनेत्यांपैकी मुलायम सिंह हे देखिल एक होते. येथे वाचा पुर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...