आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • Maharashtra Corona News And Updates, Strict Restrictions In The State From April 22 To May 1, Regulations Issued By The State Government

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'महा'लॉकडाऊन:राज्यात आज रात्री 8 वाजेपासून ते 1 मेपर्यंत निर्बंध

मुंबई17 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात अखेर कडक लाॅकडाऊन लावण्यात आला आहे. आज (२२ एप्रिल) रात्री ८ वाजल्यापासून ते १ मेच्या सकाळी ७ वाजेपर्यंत कडकडीत लॉकडाऊन असणार आहे. आंतरजिल्हा आणि आंतरशहर प्रवासाचे निर्बंध कठोर केले आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व शासकीय कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. या बैठकीत सर्वच प्रमुख मंत्र्यांनी कडक लॉकडाऊन लावण्यासाठी आग्रह धरला होता. त्यानुसार बुधवारी रात्री निर्णय घेण्यात आला. त्याची नियमावलीही जाहीर करण्यात आली. दरम्यान, नाशिकमध्ये आॅक्सिजन गळतीत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बुधवारी जनसंवाद टाळला. लाॅकडाऊनच्या मार्गदर्शक सूचना मुख्य सचिवांच्या सहीने मदत व पुनर्वसन विभागाने जारी केल्या.

किराणा, भाजीपाल्याबाबत १३ एप्रिलचेच नियम लागू
सरकारने १३ एप्रिल रोजी किराणा, बेकरी, डेअरी आणि भाजीपाला संबंधित जारी केलेले निर्देश यापुढे कायम राहतील, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या सहीने बुधवारी रात्री उशिरा जारी केले आहेत.

समारंभ : लग्नासाठी एका हॉलमध्ये २५ माणसांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. परंतु त्यासाठी फक्त २ तासांची वेळमर्यादा दिलेली आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास ५० हजार रुपये दंडसुद्धा आकारण्यात येणार आहे.

जिल्हा आणि शहर प्रवास

 • नव्या नियमावलीत जिल्हा आणि शहर प्रवास बंदीचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे. खासगी वाहतुकीसाठी चालकासह फक्त ५० टक्के प्रवाशांना परवानगी आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास १० हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. जिल्ह्याबाहेर किंवा दुसऱ्या शहरात अत्यावश्यक गरजेसाठी प्रवास करता येईल.
 • प्रत्येक व्यक्तीला शहराबाहेर जाताना जिल्हाधिकाऱ्यांना त्याची माहिती द्यावी लागेल. तसेच सर्व प्रवाशांच्या हातावर १४ दिवस क्वाॅरंटाइनचा शिक्का मारला जाईल. त्याची जबाबदारी वाहनधारकावर राहणार आहे.
 • प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग होईल. तापमान जास्त असल्यास संबंधिताला थेट कोरोना केअर सेंटरमध्ये पाठवले जाईल. तसेच प्रवाशांची रॅपिड अँटिजन टेस्ट केली जाईल. त्याचा खर्च प्रवासी किंवा वाहनधारकाने करायचा आहे.

सार्वजनिक वाहतूक

 • राज्य सरकारच्या नव्या निर्बंधांनुसार आता राज्य, केंद्रीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांना मोनो, मेट्रो, लोकल यांचा उपयोग त्यांच्या ओळखपत्रावर करता येईल.
 • डाॅक्टर, प्रयोगशाळा, आरोग्य, पॅरामेडिकल तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना ओळखपत्रावर प्रवासाची मुभा असेल.
 • वैद्यकीय कारणासाठी तसेच दिव्यांगासोबत एका व्यक्तीस प्रवास करण्याची मुभा आहे.
 • राज्य आणि स्थानिक प्राधिकरणाच्या बसेस ५०% क्षमतेने धावतील. एकही प्रवासी उभा असणार नाही.
 • रेल्वे आणि एसटी बसच्या माध्यमातून लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांच्या स्क्रीनिंगची जबाबदारी स्थानिक प्रशासन घेईल. तसेच प्रवाशांना अधिकृत प्रयोगशाळेतून रॅपिड अँटिजन टेस्टचा रिपोर्ट द्यावा लागेल.

कार्यालये : सर्व सरकारी कार्यालयांत केवळ १५%कर्मचारी हजर राहू शकतील. यात कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट दिली आहे. आवश्यक सेवेतील कार्यालयांत ५०% कर्मचाऱ्यांना काम करता येईल. मात्र, गरजेनुसार या ठिकाणी १००% पर्यंत कर्मचारी वाढवता येतील. खासगी कार्यालयांत ५ कर्मचारी किंवा १५% कर्मचाऱ्यांनाच हजर राहता येईल.
आंतरजिल्हा आणि आंतरशहर प्रवासाचे निर्बंध कठोर

.

बातम्या आणखी आहेत...