आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन आता संपूर्ण जगात पसरला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनायजेशन (WHO) ने ओमायक्रॉनला व्हेरिएंट ऑफ कंसर्नच्या यादीत टाकले आहे. आता या व्हेरिएंटचे देखील तीन नवीन सब व्हेरिएंट समोर आले आहेत. म्हणजेच याने आपले तीन नवीन रुप बनवले आहेत. भारतीय वैज्ञानिकांनी यामधील एका सब व्हेरिएंटला BA.1 नाव दिले आहे.
भारतीय विषाणूशास्त्रज्ञ ज्यांनी त्याचे जीनोम सिक्वेन्सिंग केले आहे त्यांचा असा दावा आहे की BA.1 ओमायक्रॉनपेक्षा वेगाने पसरत आहे आणि महाराष्ट्र आणि इतर काही राज्यांमध्ये ते डेल्टा व्हेरिएंटला मागे टाकत लोकांना वेगाने संक्रमित करत आहे.
संसर्गाचा झपाट्याने प्रसार होत असतानाही हा नवीन सब व्हेरिएंट धोकादायक आहे की नाही हे शास्त्रज्ञ अद्याप ठरवू शकलेले नाहीत.
तीन नवीन सब व्हेरिएंटमधून BA.1 मध्ये ओमायक्रॉनचे सर्वात जास्त गुण
वायरोलॉजिस्टच्या म्हणण्यानुसार ओमायक्रॉन व्हेरिएंट पुढे तीन सब व्हेरिएंट BA.1, BA.2 आणि BA.3 मध्ये विभाजित झाले आहे. ओमायक्रॉनच्या नवीन सब व्हेरिएंट BA.2 चे अनेक प्रकरणे साउथ अफ्रीका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये सापडले आहेत. तर BA.1 झपाट्याने भारतात पसरताना दिसत आहे.
डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी (INSACOG) च्या विषाणूशास्त्रज्ञांच्या मते, BA.1 त्याच्या जलद वाढीच्या प्रवृत्तीमुळे खूप वेगाने पसरतो आणि हाच ओमायक्रॉनचा मूळ वंश आहे. म्हणजेच त्यात ओमायक्रॉनचे सर्वाधिक गुणधर्म आहेत. सध्याच्या तिसर्या लाटेत नवीन प्रकरणांमध्ये वाढ होण्यामागे हे एक मोठे कारण आहे. BA.1 मुळेच बहुतेक रुग्णांमध्ये अतिशय सौम्य लक्षणे दिसून येतात. त्यामुळे फार कमी रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत.
का धोकादायक आहे ओमायक्रॉन
व्हायरसच्या स्पाइक प्रोटीनमध्ये अमीनो अॅसिडच्या पोजीशनला रिप्लेस करत आहे BA.1
विषाणूशास्त्रज्ञांच्या मते, BA.1 आणि BA.3 व्हायरसच्या स्पाइक प्रोटीनमध्ये अमीनो ऍसिडची पोजीशन 69-70 ला मिटवत आहे. क्लिनिकल सिक्वेन्सिंगच्या तपासणीदरम्यान, सामान्य ओमायक्रॉनऐवजी अनेक ठिकाणी BA.1 असल्याचे आढळून आले आहे. हे सर्व व्हेरिएंट एकाच फॅमिलीशी संबंधीत आहेत. यामुळे या नमुन्यांना ऑमायक्रॉन पॉझिटिव्ह मानले जात आहे.
INSACOG महाराष्ट्र आणि केरळसह अनेक राज्यांमध्ये सिक्वेन्सिंग करत आहे
The department’s Indian SARS-CoV-2 Genomics Consortium (INSACOG) म्हणजेच जैवतंत्रज्ञान विभाग महाराष्ट्र आणि केरळसह काही राज्यांसाठी जीनोम सीक्वेंसिंगचे काम पाहते. ओमायक्रॉनमध्ये 50 पेक्षा जास्त म्यूटेशन आहेत. 8 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत त्याची पहिली केस आढळून आली. तेव्हापासून ते भारतासह जगभर पसरले आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की ओमायक्रॉनच्या वंशातील विभागणी शास्त्रज्ञांसाठी अधिक इंट्रेस्टिंग आहे, कारण यामुळे महामारीविज्ञान अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल. याबाबत सर्वसामान्यांनी काळजी करण्याची गरज नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.