आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Maharashtra Gujarat Increased Health Infrastructure The Most; UP And Bihar Backward; News And Live Updates

दिव्य मराठी इन्व्हेस्टिगेशन:महाराष्ट्र आणि गुजरातने उभारल्या सर्वाधिक आरोग्याच्या पायाभूत सुविधा; उत्तर प्रदेश आणि बिहार राज्य प‍िछाडीवर

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रात अ‍ॅम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनचा साठा 60 हजारांवर

डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे संपूर्ण देशात चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे. काही तज्ञांच्या मते, डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे कोरोना व्हायरसची त‍िसरी लाट येईल असा अंदाज वर्तवला जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संबधित राज्यांना कडक न‍िर्देश दिले आहेत. कोरोनाची त‍िसरी लाट लक्षात घेता देशातील काही राज्यांनी याला रोखण्यासाठी तयारी सुरु केली आहे. तर काही राज्य असे आहेत जेथे अजूनही आरोग्याच्या पायाभूत सुव‍िधा पाहिजे तेवढ्या प्रमाणात नाहीयेत. देशात या सुव‍िधांच्या बाबतीत महाराष्ट्र आण‍ि गुजरात राज्य सर्वात प्रथम असून ब‍िहार आण‍ि उत्तर प्रदेश अजूनही मागे आहेत. कोव‍िड रुग्णालय जर सोडले तर इतर बाबींमध्ये राजस्थान देशात सर्वात वर आहे. यामध्ये ऑक्सीजन प्लांट, आयसीयू बेड, व्हेंट‍िलेटर आदी गोष्टींचा समावेश आहे.

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी देशातील किती राज्ये तयार आहेत ते तपासण्यासाठी द‍िव्य मराठी टीमने सात राज्यांचा दौरा केला. यामध्ये राज्यांतील सरकारी आण‍ि खाजगी कोव‍िड रुग्णालयांची संख्या, ऑक्स‍िजन प्लांट, आयसीयू, व्हेंटिलेटर आदी सुव‍िधांचा यामध्ये आढावा घेण्यात आला.

सरकारी कोविड रुग्णालयांची संख्या ह‍िमाचल प्रदेशामध्ये सर्वात जास्त
तपासानुसार, ह‍िमाचल प्रदेशातील सरकारी रुग्णालयात सर्वात जास्त कोविड उपचार केंद्र असून हे 54.54% आहे. तर दुसर्‍या क्रमांकावर महाराष्ट्र असून त‍िसर्‍या क्रमांकावर छत्तीसगड आहे. तर दुसरीकडे ब‍िहार राज्यात आरोग्याची पायाभूत सुव‍िधांची वाढ शुन्य टक्के आहे. उत्तर प्रदेशातही कोव‍िड रुग्णालयांच्या संख्येत 1.7% ने वाढ झाली आहे. त्यामुळे हे राज्य कोरोनाच्या तिसर्‍या लाटेशी कसा सामना करतील हा प्रश्न पडतो.

खाजगी रुग्णालयात महाराष्ट्र प्रथम
कोरोनाकाळात सर्वात जास्त खाजगी रुग्णालयाची वाढ ही महाराष्ट्रात झाली असून दोन नंबरवर गुजरात राज्य येतो. महाराष्ट्रात खाजगी रुग्णालयात 42.35% तर गुजरातमध्ये 41.17 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ ऑक्स‍िजन प्लांटची संख्येतदेखील वाढ झाली आहे. गुजरात राज्यात आधी 24 प्लांट होते आता 400 आहे. कोरोनाच्या पह‍िल्या लाटेत सर्वात जास्त व्हेंट‍िलेटर महाराष्ट्रात असून त्यांची संख्या आता 12 हजार 863 वर आली आहे. तर गुजरात राज्यात आधी 7 हजार होते आता 15 हजार व्हेंट‍िलेटर उपलब्ध आहेत.

महाराष्ट्रात अ‍ॅम्फोटेरिसिन-बी इंजेक्शनचा साठा 60 हजारांवर
राज्य सरकारने रेमडेस‍िवीर आणि काळ्या बुरशीवर उपयोगात येणारी अ‍ॅम्फोटेरिसिन-बीचा इंजेक्शनचा पुरेसा साठा असून याची मात्रा 60 हजारांवर असलाच्या दावा केला आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशने टेलिमेडिसिन सेवा सुरू केली आहे.

पीएम केअर फंडमधून ऑगस्ट पर्यंत उभारले जातील ऑक्सिजन प्लांट
राज्यात गेल्या काही द‍िवसांपासून पीएम केअर फंडमधून मोठ्या प्रमाणात ऑक्स‍िजन प्लांटची निर्मिती केली जात आहे. दरम्यान, देशात आतापर्यंत 551 ऑक्स‍िजन प्लांट उभारण्यात आले आहेत. यामध्ये सर्वात जास्त प्लांट उत्तर प्रदेशात असून याची संख्या 114 आहे. महाराष्ट्र राज्यातदेखील दररोज 3 हजार मेट्र‍िक टन ऑक्स‍िजनची न‍िर्मिती केली जाते.

बातम्या आणखी आहेत...