आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Maharashtra Leaders Running And Jogging For Bharat Jodo Yatra, Latest News And Update

भारत जोडो यात्रेसाठी फिट होत आहेत मंत्री:महाराष्ट्रातील अनेक नेते वेगाने चालण्या-पळण्याचा करत आहेत सराव

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे लवकरच महाराष्ट्रात आगमन होणार आहे. त्यामुळे पक्षाचे अनेक नेते या यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत चालण्यासाठी व पळण्यासाठी कसून सराव करत आहेत. यासाठी ते दररोज सकाळी उठून चालण्याचा सराव व व्यायाम करत आहेत.

7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात पोहोचणार यात्रा

भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबर रोजी तेलंगणातून महाराष्ट्रात पोहोचणार आहे. 14 दिवसांची ही यात्रा 15 विधानसभा व 6 संसदीय मतदार संघातून जाईल. भारत जोडो यात्रा सोमवारी सायंकाळी देगलूरमार्गे महाराष्ट्रात दाखल होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वा. देगलूर बसस्थानकापासून पायी मार्च सुरू होईल. महाराष्ट्र काँग्रेसने या यात्रेच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. या ठिकाणी राज्याचे संपूर्ण नेतृत्व उपस्थित राहील.

राहुल गांधींच्या खांद्याला खांदा लावून चालणार

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, माझ्यासह पक्षाचे अनेक नेते भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून चालतील. नांदेडचे काँग्रेस कार्यकर्ते यात्रेत सहभागी होण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. त्यामुळे आम्ही वेळ मिळेल तेव्हा प्रॅक्टीस व व्यायाम करतो. चालणे तब्येतीसाठी चांगले असते.

382 KM चा प्रवास

दुसरीकडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की, ते यात्रेसाठी स्वतःला तयार करण्यासाठी दररोज पुश-अप काढत आहेत. पक्षाचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने माझे राहुल यांच्यासोबत 382 KM चालण्याचे कर्तव्य आहे. काँग्रेस नेते तथा नांदेडचे आमदार डी पी सावंत यांनीही शक्य होईल तेवढे राहुल यांच्यासोबत चालण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. आम्ही सर्वचजण सकाळी 5 किमी चालण्याचा सराव करत आहोत, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...