आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवाली शिंदे (४४) आणि तेजल हसबनीसने (३३) आपल्या झंझावाती खेळीतून महाराष्ट्र संघाला सोमवारी सीनियर महिला टी-२० लीगची फायनल गाठून दिली. स्मृतीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघाने उपांत्य सामन्यामध्ये बडोदा टीमला १९.१ षटकांत सहा गड्यांनी धूळ चारली. राधा यादवच्या नेतृत्वाखाली बडोदा संघाने प्रथम फलंदाजी करताना सात बाद १२१ धावा काढल्या. प्रत्युत्तरात महाराष्ट्र महिला संघाने चार गड्यांच्या मोबदल्यात विजयश्री खेचून आणली. यासह चार वेळच्या उपविजेत्या महाराष्ट्र संघाने पाचव्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. संघाच्या विजयात आैरंगाबादच्या मुक्ता मगरेच्या ( २ बळी, नाबाद १० धावा) अष्टपैलू खेळीचे मोलाचे योगदान ठरले. महाराष्ट्राने आतापर्यंत २००९, २०१४, २०१५ व २०१७ मध्ये फायनल गाठली होती. मात्र, चारही वेळा संघ उपविजेता ठरला.
उत्कर्षा, मुक्ताची शानदार गोलंदाजी : महाराष्ट्र संघाकडून उत्कर्षा पवारने ३ आणि मुक्ताने २ बळी घेतले. त्यामुळे बडोदा संघाचा मोठ्या धावसंख्येचा प्रयत्न अपयशी ठरला. बडोद्याच्या यस्तिका भाटियाची (७१) अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.