आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंगालच्या उपसागरातील आग्नेय भागात ९ मेपर्यंत चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. मच्छीमारांना या भागात जाऊ नये, असा इशारा बुधवारी हवामान खात्याने दिला आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी म्हणाले, चक्रीवादळ मध्य बंगालच्या उपसागराच्या दिशेने उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. ६ मे रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून त्यानंतर चक्रीवादळ निर्माण होण्यास सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. येमेनने एका शहराच्या नावावरून चक्रीवादळाचे ‘मोचा’ असे नामकरण केले आहे.
मराठवाड्यात आज पुन्हा अवकाळीचा अंदाज :
राज्यात गुरुवार, ४ मे राेजी विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. बुधवारी सकाळी राज्यात बहुतेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते, मात्र दिवसभरात अगदी तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला.
उत्तराखंडमध्ये ग्लेशियर तुटल्याने केदारनाथकडे जाणारा पादचारी मार्ग बंद
हिमाचल, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये काही ठिकाणी पावसासह बर्फवृष्टी झाली. उत्तराखंडमध्ये भैरव गडेरा, कुबेर गडेरा दरम्यानचा रस्ता केदारनाथच्या दिशेने पदपथावर हिमनग आल्याने तात्पुरता बंद करण्यात आला आहे. बद्रीनाथसह चार धाम यात्रेला जाणाऱ्या लोकांना परत थांबण्यास सांगण्यात आले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.