आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Maharashtra MPs Most Active; Two And A Half Times As Many Questions Were Asked As Compared To UP Bihar Members

12 खासदारांचे 4 वर्षांपासून मौन:महाराष्ट्राचे खासदार सर्वात सक्रिय; यूपी-बिहार सदस्यांच्या तुलनेत अडीचपट जास्त विचारले प्रश्न

अनिरुद्ध शर्मा|नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ आणखी एक वर्ष आहे. अर्थसंकल्पाचे ११ वे अधिवेशन पूर्ण झाल्यानंतर आता केवळ तीन अधिवेशन पावसाळी, हिवाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल. आता सर्व पक्षांनी आपल्या खासदारांच्या कामगिरीचे रिपोर्ट कार्ड बनवण्यास सुरुवात केली आहे. खासदारांची हजेरी, चर्चेत भाग घेणे, प्रश्न विचारणे आणि आपल्या बाजूने विधेयक आणण्यासारख्या कामाच्या आधारावर “भास्कर’ने खासदारांच्या कामगिरीचे आकलन केले आहे. त्यानुसार, लाेकसभेत महाराष्ट्रातील खासदार सर्वाधिक सक्रिय राहिले,त्यात ते सत्ताधारी पक्षाचे असोत की विरोधी पक्षाचे. सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ चार खासदार आहेत.मात्र, त्यांनी १६८९ प्रश्न विचारले. सर्वात जास्त प्रश्न महाराष्ट्रातूनच विचारले जात आहेत. ४८ मराठी खासदारांनी १२,७८० प्रश्न विचारले. हे उत्तर प्रदेशातून विचारलेल्या ७,९६८ प्रश्नांपेक्षा जास्त आहेत. ते बिहार, यूपीच्या खासदारांच्या तुलनेत अडीच पट प्रश्न विचारत आहेत. भाजपचे तीन खासदार भगीरथ चौधरी, मोहन मांडवी व रमेशचंद्र कौशिक यांच्यासह ६ खासदारांनी सभागृहाच्या बैठकांत शंभर टक्के भाग घेतला. १२ खासदार चार वर्षांत एकदाही बोलले नाहीत.

मनोरंजन क्षेत्रातून सनी देओल सर्वात कमी सक्रिय
चित्रपट, टीव्ही जगतातील सदस्यांमध्ये सनी देओल सर्वात कमी सक्रिय आहेत. त्यांनी केवळ एक प्रश्न विचारला आणि २१% हजर राहिले. शत्रुघ्न सिन्हाही सक्रिय नाहीत. या जागेवरून आधी निवडून आलेले बाबुल सुप्रियो यांचा प्रश्न विचारणे, चर्चेत भाग घेण्याची कोणतीही नोंद नाही. किरण खेर ४७% हजर राहिल्या आणि १०६ प्रश्न विचारले. ४९% हजर राहिलेल्या हेमा मालिनीही १७ वेळा सभागृहात बोलल्या आहेत. त्यांनी ८१ प्रश्न विचारले आणि एक खासगी विधेयक सादर केले. नवनीत राणा यांनी(८३%) १४२ प्रश्न विचारले आणि ८४ चर्चेत भाग घेतला. नुसरत जहां २३% आणि मिती चक्रवर्ती २४% हजर राहिल्या तसेच दोघींनी १२१ व १३० प्रश्न विचारले. दिल्लीतील दोन गायक मनोज तिवारी ८४% तर हंसराज हंस ४१% हजर राहिले. गोरखपूरहून रवी किशन शुक्ला यांनी ७४ चर्चांत भाग घेतला आहे. दिनेश लाल निरहुआ यांची हजेरी ९५% आहे.

१२८ खासदारांनी खासगी विधेयक सादर केले
१२८ खासदारांनी खासगी विधेयक सादर केले. यापैकी १८ खासदारांनी १० पेक्षा जास्त विधेयक सादर केली. मात्र, यापैकी कोणतेही विधेयक मंजूर होऊ शकले नाही. मात्र, अनेक विधेयकांवर चर्चेनंतर सरकारच्या आश्वासनानंतर विधेयक
मागे घेतले.

भापच्या ९५, काँग्रेसच्या १४ खासदारांची हजेरी ९०%
भाजपच्या ३०३ पैकी ९५ खासदारांची सभागृहात ९०% पेक्षा जास्त बैठकांत हजेरी राहिली. काँग्रेसच्या १४ खासदारांची उपस्थिती ९०% पेक्षा जास्त राहिली. राहुल गांधींची ५२% तर सोनिया गांधींची ४४% राहिली. राज्यांमध्ये हरियाणा अव्वल आहे.

विविध खासदारांचे प्रश्न
राज्य प्रश्न विचारले सरासरी
महाराष्ट्र 12,780 266
आंध्र प्रदेश 5456 218
केरळ 4287 214
राजस्थान 4588 183
झारखंड 2368 169
गुजरात 3778 145
दिल्ली 923 131
हरियाणा 1166 116
मध्य प्रदेश 3186 109
बिहार 4258 106
उत्तर प्रदेश 7968 99
पंजाब 911 76

प्रश्न विचारणारे टॉप-3
{सुकांत मजुमदार 533
(बालुरघाट, प. बंगाल)

{सुप्रिया सुळे 521 (बारामती, महाराष्ट्र)

{अमोल कोल्हे 520 (शिरूर, महाराष्ट्र)

बातम्या आणखी आहेत...