आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नात्याची हत्या:नवी मुंबईत निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याने आपल्या दोन मुलांवर झाडल्या गोळ्या, एकाचा मृत्यू तर एकाची मृत्यूशी झुंज सुरू

नवी मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तिघांमध्ये नेहमीच भांडणे होत असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले.

नवी मुंबईत रात्री उशीरा एका निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याने दोन तरुण मुलांवर गोळ्या झाडल्या आहेत. यामधून एकाचा मृत्यू झाला आहे आणि दुसरा मृत्यूशी झुंज देत आहे. सुरुवातीच्या तपासात घरगुती कारणामुळे हत्या केली असल्याची माहिती मिळाली आहे. जिवंत असलेल्या मुलाची परिस्थिती गंभीर आहे. डॉक्टरांनी गोळी काढली आहे, मात्र अजुनही त्याला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. ऐरोलीच्या इंद्रावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

तपासात समोर आले आहे की, दोन्ही मुलं हे वडिलांपासून वेगळे राहत होते. तिघांमध्ये नेहमीच भांडणे होत असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. नवी मुंबई पोलिसांनुसार, सोमवारी रात्री उशीरा भगवान पाटील यांनी दोन्ही मुलं विजय आणि अजयला घरी बोलावले आणि नंतर तिघांमध्ये भांडणे सुरू झाली. यानंतर पाटील यांनी आपल्या मुलांवर चार गोळ्या झाडल्या, ज्यामध्ये एक गोळी काचेवर लागली आणि दोन गोळ्या मोठा मुलगा विजयच्या पोटात लागल्या. एक गोळी धाकट्या मुलाला लागली. दोन्हींना शेजाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले, येथे उपचारांदरम्यान मोठ्या मुलाने जीव गमावला आहे.

गाडीच्या सर्व्हिसिंगच्या पैशांविषयी झाला वाद या प्रकरणाचा तपास करणाऱ्या नवी मुंबईच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, '71 वर्षीय निवृत्त पोलिस अधिकारी भगवान पाटील आणि त्याच्या मुलांमध्ये गाडीच्या सर्व्हिसिंगविषयी वाद सुरू झाला होता. ज्यानंतर हा वाद मारहाणीपर्यंत गेला आणि नंतर त्यांनी आपल्या पिस्तुलने चार गोळ्या झाडल्या. घटना घडल्यानंतर आरोपीने तेथून पळ काढला नाही. सध्या आम्ही त्यांना अटक केली आहे.'