आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Maharashtra Train Engine I Chandrapur Balharshah Passengers Video Goes Viral In Gondia I Latest News  

इंजिनमध्ये बिघाड झाल्याने रेल्वे पडली बंद:प्रवाशांना जंगलातून पायी प्रवास करावा लागला, गोंदिया-चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

मुंंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील गोंदियाहून चंद्रपूरच्या बल्लारशाहकडे जाणारी रेल्वे मंगळवारी धावत असताना अचानक बंद पडली. चंद्रपूर जिल्ह्यातील चांदाफोर्ट रेल्वे स्थानकावरपासून दुपारी 4 वाजेच्या सुमारास इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ही गाडी थांबण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

यावेळी प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अनेक तास प्रतीक्षा करूनही रेल्वेचे इंजिन सुरळीत न झाल्याने प्रवाशांना तेथून पायीच रेल्वे मार्गावरून जावे लागले. तर अनेक प्रवाशी रेल्वे सुरू होण्याची प्रतीक्षा करत बसले होते.

जेथून पायी प्रवास केला, तो भाग धोकादायक

प्रवाशांचा चालतानाचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेला भाग चंद्रपूर जिल्ह्यातील वनक्षेत्रातील भाग असून तो अतिशय धोकादायक आहे. वाघ, अस्वल, बिबट्या यांच्या हल्ल्यात माणसांच्या मृत्यूच्या अनेक बातम्या समोर येत असतात. अशा स्थितीत जंगलाच्या परिसरात अचानक रेल्वेचे इंजिन बंद पडल्याने जीव धोक्यात आला नाही. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा ग्रुप ट्रेनच्या मार्गावरून चालत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ट्रेन बंद झाल्याने त्रासलेल्या प्रवाशांनी हे पाऊल उचलले. प्रवाशांचे हे पाऊल धोकादायकही ठरू शकते.

प्रवाशांना अनेक तास वाट पाहावी लागली, त्यामुळे काही लोक पायीच निघाले तर काही लोक ट्रेनमध्येच थांबले.
प्रवाशांना अनेक तास वाट पाहावी लागली, त्यामुळे काही लोक पायीच निघाले तर काही लोक ट्रेनमध्येच थांबले.

ट्रेनच्या धडकेने अनेक जनावरांचा मृत्यू झाला
चंद्रपूरच्या या भागात अनेकदा वाघ आणि अस्वलांचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झालेला आहे. यापूर्वी महाराष्ट्र सरकारचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही चंद्रपूरमधील 5 वाघांची सुटका करण्याचा आग्रह धरला होता.

बातम्या आणखी आहेत...