आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Maharashtra Twin Sisters Wedding Viral VIDEO | Hindu Marriage Act I Latest Solapur News 

दोन बायका, कायदा काय म्हणतो ते ऐका:किती होऊ शकते शिक्षा, काय आहे तरतुदी, वाचा सविस्तर

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी लग्न केले. सोलापूरातील माळेवाडी येथील एका लॉनवर हा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. दोन्ही बहिणी IT इंजिनिअर असून लहानपणापासूनच मैत्रिणीप्रमाणे राहिल्या. तर पुढेही एकत्र राहण्यासाठी त्यांनी एकाच वराची निवड केली.

महाराष्ट्रासह देशभरात या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली. मात्र, दोन्ही मुलींच्या आणि नवरदेवाच्या आनंदावर काही वेळातच विरजन पडले आहे. कारण त्या नवरदेवावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर विवाहसंबंधीचे कायदे कोणते आहेत. त्याचे उल्लंघन केल्यानंतर त्या कायद्याअंतर्गत काय शिक्षा होऊ शकते. या चर्चेला उधाण आले आहे. चला तर आज आपण जाणून घेऊया विवाहसंबंधीचे कायदे आणि त्यातून होणारी शिक्षा.

सोलापूरच्या दोन वधू-एका वराची कहाणी समजून घेऊ

 • सोलापूरात पार पडलेल्या लग्नसोहळ्यात रिंकी आणि पिंकी या दोन जुळ्या बहीणीने ट्रॅव्हल्स एजन्सीचा व्यवसाय करणाऱ्या मुंबईतील अतुलशी शुक्रवारी विवाह केला. दोघींनी अतुलशी लग्न केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. अशातच लोग देखील विचारू लागले आहे की, हे लग्न कायदेशीररित्या वैध आहे का?
 • वडिलांच्या निधनानंतर दोन्ही जुळ्या बहिणींची आईही आजारी पडू लागली. काही दिवसांपूर्वी त्यांच्या आईची प्रकृती अचानक बिघडली. त्यावेळी अतुलने आईला रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. मग हळू हळू अतुल पिंकी आणि रिंकीजवळ आला. तर तिघांनीही घरच्यांच्या समतीचे लग्न केले आहे.
 • दरम्यान,विवाहाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका व्यक्तीने पोलिसात तक्रार केली. यानंतर पोलिस ठाण्यात नवरदेव अतुलवर कलम 494 अंतर्गत गुन्हा दाखल झाला.

चला तर कायद्याबद्दल जाणून घेऊया

 • आपल्या देशात वेगवेगळ्या धर्मांमध्ये विवाह आणि घटस्फोट यासंबंधी वेगवेगळे कायदे करण्यात आलेले आहेत.
 • हिंदूमध्ये विवाहासाठी हिंदू विवाह कायद्याप्रमाणे. मुस्लिम विवाहासाठी मुस्लिम पर्सनल लॉ. तर हिंदूव्यतिरिक्त, हिंदू विवाह कायदा फक्त शीख, जैन आणि बौद्ध धर्मातील लोकांना देखील लागू होतो.
 • 1995 च्या हिंदू विवाह कायद्याच्या कलम 5 मध्ये विवाह वैध मानला जाणाऱ्या अशा अटी नमूद करण्यात आल्या आहेत.
 1. पहिली अट दोघेही अविवाहित हवे.
 2. मुलाचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त आणि मुलीचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.
 3. हिंदू विवाह कायद्यानुसार, लग्नासाठी वधू आणि वर दोघांची संमती आवश्यक आहे.
 • हिंदू धर्मामध्ये पहिला पती किंवा पत्नी जिवंत असताना, दुसरा विवाह करू शकत नाही. दुसरा विवाह तेव्हाच होईल जेव्हा पहिला पती किंवा पत्नीचा मृत्यू होईल.
 • किंवा 7 वर्षांपासून पती किंवा पत्नीबद्दल काहीही माहिती नसेल. अर्थात तो किंवा ती जिवंत नसल्याची खात्री होत नाही. तसेच कोणताही पुरावा नसेल. तेव्हा देखील दुसरे लग्न करता येते.
 • एकंदरीत, जे लोक हिंदू विवाह कायद्याच्या कक्षेत येतात. त्यांना त्यांची पहिली पत्नी किंवा पती मृत किंवा घटस्फोटित असतील तेव्हाच पुनर्विवाह ते करू शकतात.

हिंदूप्रमाणेच ख्रिश्चन धर्मातही दुसरा विवाहावर बंदी

 • हिंदूंप्रमाणेच ख्रिश्चन धर्मातही दुसरा विवाह निषिद्ध आहे, पती किंवा पत्नी मरण पावल्यावरच ख्रिश्चन धर्मियात दुसरे लग्न करू शकतात. मुस्लिमांना चार विवाह करण्याची परवानगी आहे. याशिवाय 1954 मध्ये लागू झालेला विशेष विवाह कायदाही आहे. हा कायदा दोन भिन्न धर्माच्या प्रौढांना विवाह करण्याचा अधिकार देतो. विशेष विवाह कायदा सर्वांना लागू होतो. या अंतर्गत लग्नाची नोंदणी करण्यासाठी कोणताही बदल करण्याची गरज नाही.

यामुळे अतुलवर गुन्हा, त्याला ही होऊ शकते शिक्षा ?
सोलापुरात दोन जुळ्या बहिणींचा विवाह केल्याप्रकरणी नवरदेव अतुल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदूंमध्ये दोन विवाह निषिद्ध असताना त्याने दोन विवाह केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध IPC कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमात म्हटले आहे की, जर पती किंवा पत्नीने दुसरे लग्न केले तर अशा स्थितीत हा विवाह अवैध आहे. असे केल्यास 7 वर्षांपर्यंत कारावास किंवा दंडांची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

हिंदू विवाह अवैध कधी होतो

विवाहासाठी आवश्यक तरतुदींची पूर्तता झाली नाही तर विवाह अवैध मानला जातो. खालील स्थितीत विवाह अवैध मानला जातो.

 • पती अथवा पत्नी विवाहित असताना जर दुसरा विवाह केला असेल, तर असा दुसरा विवाह अवैध मानला जातो.
 • पती-पत्नी कायद्यामध्ये दिलेल्या प्रतिबंधित नातेसंबंधांमधील असल्यास त्यांच्यामधील विवाह अवैध मानला जातो.
 • पती-पत्नी सपिंड असल्यास त्यांच्यामधील विवाह अवैध मानला जातो.

हिंदू विवाह रद्दबातल कधी करता येतो

विवाह करताना काही तरतुदींची पूर्तता न झाल्यास विवाह जरी अवैध नसला तरी तो कोर्टातून रद्दबातल करता येतो

 • विवाहाच्या वेळेस पती अथवा पत्नी मानसिक दृष्ट्‍या सक्षम नसल्यास.
 • विवाह करताना फसवणूक करण्याच्या उद्देशाने महत्त्वाची माहिती लपवली असल्यास.
 • विवाह जोर जबरदस्तीने झाला असल्यास.
 • पती अथवा पत्नी विवाह संबंध ठेवण्यास सक्षम नसल्यास.
 • पत्नी विवाहाच्या वेळेस त्रयस्थ व्यक्ती पासून गर्भवती असल्यास व ही माहिती पतीपासून लपवली असल्यास.
 • विवाह झाल्यापासून 1 वर्षाच्या आत पती कोर्टात दावा दाखल करून विवाह रद्द बातल करून घेऊ शकतो.
बातम्या आणखी आहेत...