आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभूमिगत पाइपलाईन अचानक फुटल्याने पाण्याच्या प्रेशरने रस्ताच फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना यवतमाळमध्ये घडली आहे. पाण्याचे प्रेशर इतके होते की, रस्त्याचा काही भाग पाण्याबरोबर सुमारे 15 फुटापर्यंत उंच उडाला. त्याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या स्कूटीवरील महिला देखील जखमी झाली आहे. ही संपूर्ण घटना बाजूला असलेल्या एका घरातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तर सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
आवाज असा जणू भूकंप झाला
या घटनास्थळालगत प्रत्यक्षदर्शी असलेल्या पूजा बिस्वास या महिलेने सांगितले की, पाण्याच्या दाबाने भूमिगत पाइपलाइन फुटली होती आणि सर्वत्र पाणी तुंबले होते. या वेळी जणू काही मोठा स्फोट झाला असा आवाज सुरूवातीला आल्याचे पूजा यांनी सांगितले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रस्ता फुटल्याचा आवाजही रेकॉर्ड झाला आहे. दाबामुळे रस्त्यावर प्रथम भेगा पडल्या आणि काही सेकंदातच पाणी कारंज्यासारखे बाहेर पडले. भूमिगत पाईपलाईन फुटल्याचा आवाज जणू भूकंपच होत असल्याचा भास होत होता.
अमृत योजनेंतर्गत टाकली होती पाईपलाईन
यवतमाळमध्ये अमृत योजनेंतर्गत रस्ते खोदून पाइपलाइन टाकण्यात आली, मात्र पाण्याचा दाब वाढल्याने पाइपलाइन फुटली. नंतर हे पाणी जमीनीतून बाहेर आले. अमृत योजनेच्या कामात गडबड झाल्याने अशा घटना होत असल्याचा आरोप विदर्भ गृहनिर्माण संस्थेतील लोकांनी केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.