आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

च्यवनप्राश या औषधीचे जनक महर्षी च्यवन:तपोस्थळी 75 कोटीत होणार तीर्थस्थळ, हरियाणा देणार महर्षी च्यवन यांना नवी ओळख

नारनौल4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज च्यवनप्राश घराघरात आहे... मात्र, या औषधीचे जनक महर्षी च्यवन यांच्याबाबत फार कमी लोकांना माहीत आहे. आता हरियाणातील नारनौल शहराजवळ महर्षी च्यवन यांचे तपोस्थळ ढोसी पर्वताला तीर्थस्थळाचे रूप दिले जाईल. सरकारने यात्रेकरूंच्या वाहतुकीसाठी रोपवेव्यतिरिक्त येथे आयुष वेलनेस सेंटर तसेच साहसी खेळ सुरू करण्याची तयारी केली आहे. या कामावर जवळपास ७५ कोटी रुपये खर्च केले जातील. यापैकी अर्धी रक्कम १२०० मीटर ऊंच पर्वतापर्यंत पोहोचण्यासाठी रोपवे बनवण्यावर खर्च होईल.मागच्या वर्षी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्‌टर इथे आले तेव्हा पर्वतावर पोहोचण्याच्या मार्गाबाबत चर्चेला उधाण आले होते. त्या वेळी पर्वतापर्यंत रस्ता बनवण्याचा प्रस्ताव होता. मात्र, त्याऐवजी आता रोप-वे बनवण्याची तयारी सुरू आहे. याशिवाय इथे वेलनेस सेंटर, नॅरचोपॅथी सेंटर बनवले जातील. पर्वताच्या तळाशी असलेल्या कुलताजपूर येथे यात्रेकरूंच्या विश्रामासाठी हॉटेल-रिसॉर्टही बनवले जातील. या प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करून याच आठवड्यात मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे. त्यांच्या मंजुरीनंतर ही योजना भारत सरकारच्या मंजुरीसाठी पाठवली जाईल.

कशी झाली च्यवनप्राशची उत्पत्ती : प्राचीन ग्रंथांनुसार ढोसी भागात भृगू ऋषिंचे आश्रम होते. त्यांचा मुलगा च्यवन ऋषिंचा जन्मही याच आश्रमात झाला. असे म्हणतात की, ढोसीवर तपश्चर्येत मग्न महर्षि च्यवन यांच्या शरीरावर मातीचे आवरण जमा झाले होते. त्याच वेळी सूर्यवंशी राजे शर्याती कुटुंबासह इथे भ्रमंतीसाठी आले. त्यांची मुलगी राजकुमारी सुकन्याने च्यवन ऋषिंच्या मातीने झाकलेल्या आकृतिमध्ये लाकूड घुसवले आणि त्यातून रक्त वाहायला लागले. राजाने माती हटवून पाहिले असता त्यांना महर्षी च्यवन दिसले. त्यानंतर सुकन्याने आश्रमातच च्यवन ऋषिंची पत्नी होऊन त्यांची सेवा करत पश्चाताप करण्याचा निर्णय घेतला. यानंतर देवतांचे वैद्य अश्विनी कुमार यांच्या आशीर्वादाने महर्षी च्यवन यांना तरुण बनवले. इथेच त्यांनी औषधी वनस्पतींपासून शरीरात कायम स्फूर्ती आणणारे औषध च्यवनप्राश तयार केले.

काय आहे ढोसीचे महत्त्व : हरियाणा आणि राजस्थानच्या सीमेवरील हे पर्वत अरावली पर्वतरांगांचा भाग आहे. वैदिक काळात याला आग्नेयगिरीही म्हटले जात होते. या पर्वतावर अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत. इथे वैदिक काळातील प्रसिद्ध ऋषी च्यवन यांचे आश्रमही आहे. महाभारत आणि पुराणांतही या पर्वताचा उल्लेख आढळतो. इतेच सुमारे ७ हजार वर्षांपूर्वी तपस्या करतान महर्षी च्यवन यांनी पर्वतावर उपलब्ध वनस्पतींपासून सर्वप्रथम आयुर्वेदिक च्यवनप्राश बनवल्याची आख्यायिका आहे. या ठिकाणी सूर्य व चंद्र कुंडांत स्नान करण्यालाही विशेष महत्त्व आहे.

बातम्या आणखी आहेत...