आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाची गोष्टमुलीचा जन्म झाल्यानंतर मिळतील 50 हजार:राज्य शासनाची 'माझी कन्या भाग्यश्री' योजना; जाणून घ्या- कसा मिळतो लाभ

औरंगाबाद I प्रताप अवचार23 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

महाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना 1 एप्रिल 2016 रोजी सुरू केली. मुलींच्या जन्माचे स्वागत करणे, मुलींच्या जन्माचे प्रमाण सुधारण्यासाठी आणि स्त्री-शिक्षणाला चालना देण्यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत, राज्यातील ज्या पालकांनी मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली. त्यांच्या मुलीच्या नावावर शासनाकडून 50,000 रुपये जमा केले जातात. तसेच ज्यांना दोन मुलीच आहेत. त्या पालकांच्या मुलींच्या नावे प्रत्येकी 25 हजार जमा केले जातात. मात्र, दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर पुढील सहा महिन्यात आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते.

दोन मुलींनाच मिळेल लाभ

माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकाच व्यक्तीच्या दोन मुलींनाच लाभ दिला जातो. माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत, एका मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत पालकांना कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करावी लागते. किंवा दुसरी मुलगी जन्मल्यानंतर 6 महिन्यांच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेले प्रमाणपत्र सादर करावे लागते. या योजनेअंतर्गत, पूर्वी दारिंद्र्य रेषेखालील कुटुंबे (BPL) ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपर्यंत होते. त्या कुटुंबासाठी ही योजना पात्र होती. मात्र, नवीन 1 ऑगस्ट 2017 रोजी योजनेच्या सुधारित प्रपत्रानुसार म्हणजे नवीन नियमानुसार या योजनेंतर्गत मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांवरून 7.5 लाख रुपये करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 7.5 लाख रुपये आहे. तेही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

संपूर्ण लाभ घेण्यासाठी ही अट आवश्यक
योजनेअंतर्गत मुलीला व्याजाचे पैसे मिळणार नाहीत. मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिला पूर्ण रक्कम मिळण्यास पात्र असेल. महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजनेचा संपूर्ण लाभ मिळवण्यासाठी मुलगी किमान 10 वी उत्तीर्ण आणि अविवाहित असावी. महाराष्ट्रात या योजनेंतर्गत पात्र होऊ इच्छिणाऱ्या पालकांना अर्ज करावा लागेल. योजनेअंतर्गत मुलीच्या किंवा तिच्या आईच्या नावाने बॅक ऑफ महाराष्ट्र या बॅंकेत खाते उघडले जाते. या खात्यातच राज्य सरकारकडून वेळोवेळी मुलीच्या नावाने बँक खात्यावर पैसे पाठवले जातात.

लाभ कसा व कोणाला मिळतो?

या योजनेचा लाभ एका कुटुंबातील दोन मुलींना मिळणार आहे. माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत, लाभार्थी मुलगी आणि तिच्या आईच्या नावाने नॅशनल बँकेत संयुक्त खाते उघडले जाईल. दोघींना एक लाख रुपयांचा अपघात विमा आणि 5000 रुपयांचा ओव्हरड्राफ्ट मिळेल. या योजनेनुसार, जर पहिल्याच मुलीच्या जन्मानंतर आईने किंवा वडिलांनी कुटुंब नियोनज शस्त्रक्रिया केली. तर सरकारकडून 50,000 रुपये दिले जातील. दोन मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली. तर सरकारकडून दोघींच्या खात्यावर 25-25 हजार रुपये दिले जातील. माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत राज्य सरकारने दिलेली रक्कम मुलींच्या शिक्षणासाठी वापरली जाऊ शकते.

आवश्यक कागदपत्रे (पात्रता)

 • अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा.
 • अर्जदाराचे आधार कार्ड
 • आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक
 • मोबाईल नंबर
 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • पत्त्याचा पुरावा
 • उत्पन्न प्रमाणपत्र

अर्ज कसा करायचा?
या योजनेअंतर्गत अर्ज करू इच्छिणारे महाराष्ट्रातील इच्छुक लाभार्थी. त्यांना माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अर्ज महाराष्ट्र शासन विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन डाउनलोड करावा लागेल.

अर्ज डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती द्यावी लागेल. ज्यामध्ये नाव, पत्ता, आई-वडिलांचे नाव, मुलीची जन्मतारीख, मोबाईल क्रमांक आदी माहिती भरावी लागेल.

सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे फॉर्मसोबत जोडावी लागतील आणि ती तुमच्या जवळच्या महिला व बालविकास कार्यालयात जमा करावी लागतील.

काय आहे 'माझी कन्या भाग्यश्री' योजनेचा उद्देश

'मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी' अशी एक म्हण आहे. या म्हणीवरुन स्त्री जन्माच महत्व विशद होते. ज्यांना मुले आहे, त्यांच्या वृध्द आई-वडिलांना वृद्धापकाळात वृद्धाश्रमात ठेवल्याचे उदाहरण आपण अनेकदा ऐकतो. उलट मुलींनी वृद्धापकाळात आपल्या घरी आईवडिलांना ठेऊन त्यांची काळजी घेतल्याचेही बघतो. दोन्ही घरी प्रकाश देणाऱ्या मुलींची भ्रुणहत्या रोखण्यासोबतच, मुलींच्‍या शिक्षण व आरोग्याकडे लक्ष देवून सुधारणा करणे, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, मुलींचा होणारा बालविवाह थांबविणे आणि मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी राज्य शासनाने 'माझी कन्या भाग्यश्री' ही योजना सुरु केली आहे.

आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजन करणे बंधनकारक

'माझी कन्या भाग्यश्री' योजना ही सर्व कुटूंबात जन्माला येणाऱ्या दोन अपत्य मुलीसाठी लागू केली आहे. ज्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न 7 लक्ष 50 हजार रुपये आहे, अशा समाजातील सर्व घटकांसाठी ही योजना आहे. एका मुलीच्या जन्मानंतर आईने किंवा वडिलाने कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रीया केली असल्यास मुलीच्या नावे 50 हजार रुपये मुदत ठेव म्हणून बँकेत मुदत ठेव योजनेत गुंतवणूक म्हणून ठेवण्यात येईल.

अशी मिळते 50 हजारांची रक्कम

महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईडवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

 • 50 हजार रुपये रक्कमेवर 6 वर्षासाठी मिळणारे व्याज मुलीला वयाच्या सहाव्या वर्षी काढता येईल.
 • पुन्हा मुद्दल रुपये 50 हजार रुपये गुंतवणूक करुन 6 वर्षासाठी देय होणारे व्याज वयाच्या बाराव्या वर्षी काढता येते.
 • पुन्हा मुद्दल 50 हजार रुपये गुंतवणूक करुन 6 वर्षासाठी अनुज्ञेय होणारे व्याज अधिक मुद्दल दोन्ही रक्कम वयाच्या अठराव्या वर्षी काढता येते.

हे ही वाचा तितकेच महत्त्वाचे आहे...

 1. या योजनेअंतर्गत मुदत ठेवीत गुंतविण्यात आलेली मुळ मुद्दल रक्कम व त्यावरील अठराव्या वर्षी देय असणारे व्याज अनुज्ञेय होण्यासाठी मुलीचे वय 18 वर्षे पुर्ण असणे व इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे तसेच मुलगी अविवाहीत असणे आवश्यक राहील.
 2. दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जर जुळ्या मुली जन्माला आल्या तर त्या मुली योजनेच्या लाभास पात्र असतील.
 3. बालगृहातील अनाथ मुलींना सुध्दा या योजनेचा लाभ मिळेल. यासाठी दत्तक पालकांनी मुलीचे बँक खाते उघडावे, त्या खात्यात रक्कम जमा करता येईल.
 4. वयाची 18 वर्षे पुर्ण होण्यापूर्वी मुलीचा विवाह झाला असल्यास किंवा दहावीपूर्वी शाळेतून गळती झाल्यास किंवा दहावी नापास झाल्यास या योजनेचा फायदा तिच्या पालकांना होणार नाही.
 5. मुलीच्या नावे बँक खात्यात जमा असणारी रक्कम शासनाच्या नावे असणाऱ्या खात्यात जमा करण्यात येईल.
 6. मात्र नैसर्गिक कारणाने मुलीचा मृत्यू झाल्यास मुलीच्या नावे गुंतविण्यात आलेली रक्कम मुदत ठेवीची मुदत संपल्यानंतर पुर्ण रक्कम मुलीच्या पालकांना देण्यात येईल.

स्त्रोत - महाराष्ट्र शासनाची अधिकृत संकेतस्थळ

बातम्या आणखी आहेत...