आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Major Accident On Yamuna Expressway, Two Cars Collide; 4 Killed, 4 Injured, UP Latest News

यमुना एक्सप्रेस वेवर भीषण अपघात:दोन कारची समोरासमोर धडक; 4 जण ठार, 4 जखमी

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशातील यमुना एक्सप्रेस वेवर शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. या अपघातात चार जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मथुरा जिल्ह्यातील सुरीर पोलीस स्टेशन परिसरातील आहे.

शुक्रवारी रात्री यमुना एक्सप्रेसवेच्या माइलस्टोन 87 येथे दोन कारची धडक झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी मथुरा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या पोलीस गुन्हा दाखल करून अधिक तपास करत आहेत.

यापूर्वी, 12 मे 2022 रोजी उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडाअंतर्गत यमुना एक्सप्रेसवेवर झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश होता. त्या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले होते. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील लोक आग्राहून नोएडाला जात होते. जेवर टोल प्लाझासमोर 40 किमीच्या मैलाच्या दगडाजवळ हा अपघात झाला होता.

तसेच 7 मे 2022 रोजीही यमुना एक्स्प्रेस वेवर ठाणे नौझील परिसरात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले होते. माइलस्टोन 68 जवळ हा अपघात झाला होता. यमुना द्रुतगती मार्गावर वॅगनआर कार आणि अज्ञात वाहन यांच्यात भीषण धडक झाली. कारचा स्फोट झाला. या अपघातात तीन पुरुष, तीन महिला आणि एक बालक जागीच ठार झाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला होता. या अपघातात एक व्यक्ती आणि एक बालक गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कारमधील लोक हरदोईहून दिल्लीच्या दिशेने जात होते. ते तिथे लग्न समारंभात सहभागी होणार होते.

बातम्या आणखी आहेत...