आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Make A Video Of Mother's Funeral And Send It! Strange Request Of A Child To Bhopal's Old Age Home

दिव्य मराठी विशेष:आईच्या अंत्यसंस्काराचा व्हिडिओ बनवून पाठवा!​​​​​​​ भाेपाळच्या वृद्धाश्रमाकडे मुलाची विचित्र मागणी

भाेपाळ (वंदना श्राेती )8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रमिला जोशी यांच्यावर अंत्यसंस्कार करताना घर आश्रमचे सचिव बाबा विश्वजित दुबे. - Divya Marathi
प्रमिला जोशी यांच्यावर अंत्यसंस्कार करताना घर आश्रमचे सचिव बाबा विश्वजित दुबे.
  • 3 वृद्धाश्रमांत पाच वर्षांत 60 ज्येष्ठांचा मृत्यू

एका महिलेने विवाहानंतर मूल न झाल्याने नणंदेच्या मुलास मुलगा मानले. पतीच्या मृत्यूनंतर कर्ज घेण्याच्या नावाखाली मुलाने घराच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी घेतली. काेणतेही काम केल्यावर वाद व्हायचे. मुलगा व त्याचे कुटुंब सुखी राहावे या भावनेतून ‘अपना घर वृद्धाश्रम’ मध्ये राहू लागल्या. त्यानंतर सदर महिलेने कधीही संपत्तीवर दावा केला नाही किंवा त्याची अाशाही बाळगली नाही. ही कहाणी आहे ‘अपना घर वृद्धाश्रम’ मध्ये राहणाऱ्या ६५ वर्षीय प्रमिला जाेशी यांची. अलीकडेच त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा त्यांच्या अंत्यदर्शनासाठी येण्यास मुलाने नकार दिला. उलट ताे म्हणाला, अंत्यसंस्काराचा व्हिडिआे बनवून पाठवून द्यावा. आश्रमाचे सचिव बाब विश्वजित दुबे यांनी असेच केले. हे एकटे प्रकरण नाही. भाेपाळच्या तीन वृद्धाश्रमांतील ६० वृद्धांचा असाच मृत्यू झाला. त्यांच्या मुलांनी येण्यास नकार दिला. त्यांच्यावर वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापनानेच अंत्यसंस्कार केले.

अंतिम इच्छेनुसार नर्मदा किनारी अंत्यसंस्कार
अपना घर वृद्धाश्रमात राहणारे दयाशंकर शर्मा यांची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्यावर हाेशंगाबादमध्ये नर्मदा किनारी अंत्यसंस्कार करण्यात आले. आसरा वृद्धाश्रमच्या व्यवस्थापिका राधा चाैबे म्हणाल्या, दाेन वर्षांत आठ वृद्धांचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कार वृद्धाश्रम व्यवस्थापनाने केले.

तेरवी संस्कार, तर्पणही आश्रमाद्वारे केले जाते
आनंदधामचे सचिव आर.आर. सुरंगे म्हणाले, दाेन वर्षांत तीन जणांचा आश्रमात मृत्यू झाला. त्यांच्यावर अंत्यसंस्कार, तेरवीसह सर्व संस्कार आश्रमात झाले. यापूर्वी त्यांची मुले ख्यालीखुशाली विचारण्यासाठी कधीही आली नाहीत. ते अंत्यसंस्कारालाही येत नाहीत.

बातम्या आणखी आहेत...