आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mallikarjun Kharge Continue Leader Of Opposition; Congress Party Policy |Mallikarjun Kharge Sonia Gandhi | Ashok Gehlot Rahul Gandhi

खरगे राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेच राहतील:हिवाळी अधिवेशनापूर्वी CSCचा निर्णय, राहुल संसदेच्या अधिवेशनाला उपस्थित राहणार नाहीत

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदी कायम राहणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रविवारी काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, खरगे केवळ पक्षाध्यक्ष म्हणूनच नव्हे तर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणूनही विरोधी पक्षांशी चर्चा करतील. अशा स्थितीत खरगे यांच्याकडे दोन पदे राहिल्यास ते काँग्रेसच्या 'एक व्यक्ती, एक पद' धोरणाच्या विरोधात असणार आहे.

दुसरीकडे, राहुल गांधी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहणार नाहीत. दिल्लीत काँग्रेसच्या सुकाणू समितीच्या (सीएससी) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सुकाणू समितीची पहिली बैठक
सीएससीची बैठक रविवारी दिल्लीतील एआयसीसीच्या मुख्यालयात झाली. पक्षाध्यक्ष झाल्यानंतर खऱगे यांची ही पहिलीच सुकाणू समितीची बैठक होती. ते म्हणाले की, माझा विश्वास आहे की पक्ष आणि देशाप्रती असलेल्या जबाबदारीचा हा सर्वात मोठा भाग आहे. काँग्रेस संघटना मजबूत असेल, उत्तरदायी असेल, लोकांच्या अपेक्षेप्रमाणे काम करत असेल, तरच आपण निवडणुका जिंकू शकू आणि देशातील जनतेची सेवा करू शकू.

या बैठकीला पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, केसी वेणुगोपाल, पी चिदंबरम आणि पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला
काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी खरगे यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. पण सूत्रांचे म्हणणे आहे की, किमान 7 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनापर्यंत ते या भूमिकेत राहू शकतात.

राहुल भारत जोडो यात्रेवर आहेत
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबरला सुरु झाली होती. कन्याकुमारी ते काश्मीर असे एकूण 3570 किलोमीटरचे अंतर राहुल गांधी या यात्रेच्यानिमित्ताने कापणार आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील 'भारत जोडो यात्रा' तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्रासह आज मध्य प्रदेशमधील प्रवास पुर्ण करणार आहे. मध्य प्रदेशात यात्रेचा आजचा अखेरचा आणि 12 वा दिवस आहे. आगर जिल्ह्यात जास्तीत जास्त तीन दिवस आणि दोन रात्री मुक्काम केल्यानंतर उद्या मध्य प्रदेशातून भारत जोडो यात्रा राजस्थानमध्ये दाखल होईल.

सोनियानंतर खरगे सर्वात मोठ्या फरकाने विजयी

19 ऑक्टोबर 2022 रोजी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये मल्लिकार्जुन खरगे यांनी शशी थरूर यांचा 6825 मतांनी पराभव केला. खरगे यांना 7897 मते मिळाली. तर थरूर यांना केवळ 1072 मते मिळाली. विजयासह खरगे काँग्रेसचे अध्यक्ष बनणारे 65 वे नेते ठरले. बाबू जगजीवन राम यांच्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष होणारे ते दुसरे दलित नेते आहेत. सोनियांनंतर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक त्यांनी सर्वात मोठ्या फरकाने जिंकली आहे.

बातम्या आणखी आहेत...