आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेस पक्षातील एका नेत्याची उंची जबरदस्त वाढली आहे. देशाच्या सर्वात जुन्या पक्षाचे नेतृत्व करताना तुम्हाला परसेप्शनची लढाई जिंकावी लागते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनाही हे करावे लागले. आता कर्नाटकच्या विजयामुळे त्यांच्यासाठी सर्व गोष्टी बदलतील.
येथे ही चर्चा यासाठी महत्त्वाची आहे की, देशाचे सलग 10 वर्षे नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनाही या परसेप्शनच्या युद्धाचा सामना करावा लागला होता. त्यांना गांधी घराण्याच्या हातचे बाहुले व दुबळे पंतप्रधान म्हणून अवहेलना सहन करावी लागली होती. 2009 मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वात यूपीएची दुसऱ्यांदा सत्ता आल्यानंतरही या टीकेने त्यांचा पिच्छा सोडला नव्हता.
परसेप्शनच्या लढाईत झाले मजबूत
कर्नाटक निवडणुकीतील विजयासह मल्लिकार्जुन खरगे यांनी परसेप्शनच्या लढाईतील आपली प्रतिमा अधिक मजबूत केली आहे. खरगेंनी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. ते केवळ नामधारी अध्यक्ष असल्याची तिखट टीका त्यांच्यावर केली जात होती. खरगे केवळ स्टँप असून, गांधी कुटुंबाचाच शेवटचा शब्द असेल, असा आरोप भाजपने केला होता.
अजिंक्य योद्धा
सोलीलादा सरदारा (Solillada Sardara) नावाने विख्यात खरगेंना अजिंक्य योद्धा म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी एस एम कृष्णा, धरम सिंह व सिद्धरामय्या यांना पुढे करून स्वतःची जागा दिली. कर्नाटक निवडणुकीत खरगे अत्यंत आक्रमक पद्धतीने उतरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केलेली प्रत्येक टीका त्यांनी अत्यंत हुशारीने परतावून लावली. यासाठी त्यांनी आपल्या उदार व दलित प्रतिमेचा चपखल वापर केला.
मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान मोदींना विषारी सापाची उपमा दिली. यावरून भाजपने काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. पण खरगेंनी अत्यंत चातुर्याने ही कोंडी फोडून काढली. त्याचा फायदा काँग्रेसला प्रत्यक्ष निवडणुकीत झाला.
टीकाकारांना चोख प्रत्युत्तर
खरगे यांचा हजरजबाबीपणा व कर्नाटकातील विजयामुळे त्यांच्या ताकदीत मोठी वाढ झाली आहे. या विजयाद्वारे खरगेंनी आपल्या टीकाकारांनाही चोख प्रत्युत्तर दिले आहे. कर्नाटकचे आपणच खरे सिकंदर आहोत, हे ही त्यांनी या विजयातून दाखवून दिले. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष म्हणून खरगे यांची ही पहिलीच मोठी निवडणूक होती. त्यांनी हे आव्हान यशस्वीपणे पेलून दाखवले.
कर्नाटक निवडणुकीशी संबंधित खालील बातम्या वाचा...
प्रतिक्रिया:राहुल गांधींनी मानले मतदारांचे आभार; म्हणाले - जनतेच्या शक्तीने भांडवलशाही ताकदींचा पराभव केला, द्वेषाचा बाजार उठला
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यानंतर दुपारी 2.30 वा. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात ते पत्रकारांना 6 वेळा नमस्कार करत कर्नाटकातील द्वेषाचा बाजार उठून प्रेमाचा बाजार भरल्याचे स्पष्ट केले. 'कर्नाटकने देशाला प्रेम पसंत असल्याचे दाखवून दिले,' असे ते म्हणाले. येथे वाचा संपूर्ण बातमी...
आनंदाश्रू:कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष DK शिवकुमार यांना अश्रू अनावर ; म्हणाले - सोनिया मला तुरुंगात भेटण्यास आल्या होत्या
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा विजय झाला आहे. पण याची अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. काँग्रेसच्या या विजयाबद्दल पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले - या विजयाचे श्रेय मी माझे कार्यकर्ते व पक्षाच्या नेत्यांना देतो. त्यांच्याच कष्टामुळे हा विजय मिळाला.
डी के शिवकुमार यांचा त्यांच्या कनकपुरा विधानसभा मतदार संघातून विजय झाला आहे. त्यांनी कर्नाटकचे महसूल मंत्री आर. अशोक यांचा पराभव केला. विजयाची माहिती मिळताच शिवकुमार यांनी ईश्वराचे आभार मानले. तसेच मंदिरात माथा टेकून आपल्या घराच्या बाल्कनीतून समर्थकांचे अभिवादन केले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना भावना अनावर झाल्या. त्यांनी रडतच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आपल्याला भेटण्यासाठी तुरुंगात आल्याची आठवण काढली. येथे वाचा संपूर्ण बातमी...
कानडी निवडणूक:कर्नाटकच्या भाजप सरकारचे 5 मंत्री पिछाडीवर, महसूल मंत्री आर अशोक यांचा कनकपुरा मतदार संघात पराभव
कर्नाटकात सत्ताधारी भाजपला जोरदार झटका लागला आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीत भाजपचे 5 बडे मंत्री मागे पडले आहेत. महसूल मंत्री आर अशोक यांचा कनकपुरा विधानसभा मतदार संघात दारुण पराभव झाला आहे. त्यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांनी पराभव केला.
दुसरीकडे, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी गृहनिर्माण मंत्री व्ही सोमन्ना यांच्यावर आघाडी घेतली आहे. वरुणा मतदार संघात या दोन्ही नेत्यांत तगडी टक्कर सुरू आहे. दुसऱ्या फेरीतील मतमोजणीनंतर या ठिकाणी सिद्धरामय्यांनी 1224 मतांची आघाडी घेतली होती. येथे वाचा संपूर्ण बातमी...
कोण होणार कर्नाटकचा मुख्यमंत्री?:काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज, रविवारी विधीमंडळ पक्षाची बैठक; हैदराबादेत रिसॉर्ट बुक
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या गोटात सरकार स्थापन करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. पक्षाला मुबलक जागा मिळाल्या तर काँग्रेस विधीमंडळ पक्षाची रविवारी बैठक बोलावली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी शनिवारी सायंकाळपर्यंत विजयी उमेदवारांना राजधानी बंगळुरूला पोहोचण्याचे निर्देश देण्यात आलेत.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे स्वतः कर्नाटकात तळ ठोकून आहेत. त्यांची राज्यातील घटनाक्रमावर बारकाईने नजर आहे. यावरून काँग्रेस दक्षिणेतील या महत्त्वाच्या राज्यात आपली सत्ता स्थापन करण्याची कोणतीही संधी हातातून जाऊ न देण्याच्या प्रयत्नांत असल्याचे स्पष्ट होते. येथे वाचा संपूर्ण बातमी...
गडबड गोंधळ:कर्नाटकचे CM बसवराज बोम्मई ज्या BJP उमेदवारासोबत करत होते बैठक, त्या घरात शिरला साप; माजला गोंधळ
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या कलांत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. त्यातच हावेरी मतदार संघातून एक विचित्र घटना घडली आहे. तिथे भाजप उमेदवार शिवराज सिंह सज्जन यांच्या निवासस्थानी साप शिरला. विशेष म्हणजे याच ठिकाणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई भाजपच्या नेत्यांसोबत बैठक करत होते. त्याचवेळी ही घटना घडल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी हा साप तत्काळ पकडून घराबाहेर काढला.
बोम्मईंना काँग्रेसच्या पठाण यांचे आव्हान
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई शिगगाव विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस उमेदवार यासीर अहमद खान पठाण यांनी त्यांना आव्हान दिले आहे. या जागेवर सर्वांची नजर आहे. सलग चौथ्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या बोम्मई यांनी सुरुवातीच्या कलांत पठाण यांच्यावर आघाडी घेतली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.