आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे दोन दिवस गुजरातमध्ये आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचार रणधुमाळीत त्यांची रविवारी दोन ठिकाणी सभा झाल्या. तर आज सोमवारी देखील ते विविध ठिकाणी प्रचार सभा घेणार आहेत.
दरम्यान, सुरतमधील जाहीर सभेत त्यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. यावेळी खरगे यांनी स्वत:ला अस्पृश्य असल्याचे म्हटले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे बोलणारे नेते असल्याचा घणाघात केला.
खरगे म्हणाले की, तुमच्यासारखा माणूस, जो नेहमी दावा करतो की, मी गरीब आहे. अरे भाऊ, आम्हीही गरीब आहोत. आम्ही गरिबांमधील गरीब आहोत. आम्ही अस्पृश्यांमध्ये येतो. तुमचा चहा तरी कुणी पितो, मात्र, आमचा चहा देखील कुणी पीत नाही. आणि पीएम मोदी चक्क स्वतःला गरीब असल्याचे सांगतात आणि कोणी शिवी दिली तर माझी औकात काय असे संबोधून लोकांशी चक्क खोटे बोलत आहेत.
ते खोटे बोलणारे नेते, म्हणे- कॉंग्रेसने देश लुटला
खरगे म्हणाले की, काँग्रेसने गेल्या 70 वर्षांत काय केले, असे मोदी-शहा विचारतात? 70 वर्षांत काँग्रेसने काम केले नसते, तर आज लोकशाही मिळाली नसती. असे बोलून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. तर लोक आता निर्णय घेतील. ते हुशार आहेत, लोक मूर्ख नाहीत.
एकदा खोटे बोलले तर लोक ऐकतात. मात्र, सातत्याने खोटे बोलणाऱ्या नेत्याला लोक नाकारतात हे तितके सत्य असल्याचे खरगे म्हणाले.
भाजप सरकारवर निशाणा साधला
खरगे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी गुजरातच्या भाजप सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले- 'तुम्ही गरिबांच्या जमिनी लुटताय, आदिवासींना जमीन देत नाही. जमीन, पाणी आणि जंगल कोण नष्ट करतंय? तुम्ही श्रीमंत लोकांसोबत आमची लूट करत आहात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.