आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरगेंचे पुत्र मोदींना म्हणाले नालायक:खरगे म्हणाले- प्रियांक मोदींबद्दल नव्हे एका खासदाराबद्दल बोलले, त्यांच्या तोंडी हे विधान घालू नका

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विषारी साप असल्याची टीका केल्यानंतर आता त्यांचे पुत्र प्रियांक खरगेंनी मोदींना नालायक म्हटले आहे.

कलबुर्गीत आयोजित बंजारा समाजाच्या कार्यक्रमात बोलताना प्रियांक यांनी मोदींवर टीका केली. 'मोदी पंतप्रधान आहेत, तर तुमच्यावर टीका होणारच. याचा अर्थ असा नाही की, तुम्ही रडत जनतेकडे जावे. दुर्दैवाने पंतप्रधान नेहमी व्हिक्टिम कार्ड खेळतात.'

मल्लिकार्जुन खरगेंचे स्पष्टीकरण

मल्लिकार्जुन खरगेंनी प्रियांक यांच्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. प्रियांक तसे काही म्हटले नाही असे मल्लिकार्जुन खरगेंनी म्हटले आहे. त्यांनी एका खासदाराविषयी टिप्पणी केली होती. त्यांच्या तोंडात पंतप्रधानांसाठी हा शब्द घालू नका. प्रत्येक ठिकाणी हे जाणीवपूर्वक केले जात आहे असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

खरगेंच्या टीकेवर मोदींचे उत्तर

पंतप्रधानांनी कर्नाटकातील सभांना संबोधित करताना खरगेंचे नाव न घेता त्यांच्या टीकेला उत्तर दिले होते. काँग्रेसवाले मला साप म्हणत आहेत. मात्र साप हा भगवान शंकराच्या गळ्यातील शोभा आहे आणि देशातील जनता माझ्यासाठी शिवस्वरुप आहे. म्हणून या जनतेच्या गळ्यातील साप असणे मला स्वीकार आहे असे मोदी म्हणाले होते.

याशिवाय बिदरमध्ये झालेल्या सभेत मोदी म्हणाले होते की, काँग्रेसवाल्यांनी मला 91 वेळा शिव्या दिल्या. एवढी मेहनत जर चांगल्या प्रशासनासाठी केली असती तर इतकी दयनीय अवस्था झाली नसते असे मोदी म्हणाले होते.

ही बातमीही वाचा...

काँग्रेसने सुरू केली 'PayCM CryPM' मोहीम:प्रियंकांचा आरोप 'रडणारे पीएम', बोम्मईचे प्रत्युत्तर- काँग्रेस तर 9 वर्षांपासून रडते

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी प्रचाराला वेग घेतला आहे. गेल्या दोन दिवसांत पंतप्रधानांच्या सलग सहा सभांनंतर आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक नवीन मोहीम सुरू केली आहे, ज्याला त्यांनी ‘PayCM CryPM’ असे नाव दिले आहे. ही मोहीम प्रियांका गांधी यांनी कर्नाटकच्या सभेत दिलेल्या विधानानंतर सुरू झाली होती, ज्यात त्यांनी म्हटले होते की, पंतप्रधान सतत त्यांचे दुःख रडत असतात. (वाचा पूर्ण बातमी)