आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mallya, Choksi, Repayment Of Banks By Selling Nirav's Assets; 9,041 Crore Returned To PNB; News And Live Updates

नवी दिल्ली:मल्ल्या, चोकसी, नीरवची संपत्ती विकून केली बँकांची परतफेड; पीएनबीला परत केले 9,041 कोटी रुपये

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आजवर या प्रकरणांत 18,170 कोटींची मालमत्ता जप्त झाली आहे.

विजय मल्ल्या, मेहुल चाेकसी आणि नीरव मोदीच्या गैरव्यवहाराचा फटका बसलेल्या सरकारी बँकांना ईडीने ९,०४१.५ कोटींच्या मालमत्तेचे हस्तांतरण केले. ईडीनुसार, “मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाइन्सशी संबंधित प्रकरणात पीएनबीच्या ४०% रकमेची वसुली पीएमएलएअंतर्गत जप्त शेअर्सच्या विक्रीतून झाली आहे.’ शुक्रवारपर्यंत शेअर्स विक्रीतून आणखी ८०० कोटींच्या वसुलीची आशा आहे.

ईडीने सांगितले की, मल्ल्याला उधारी देणाऱ्या कन्सोर्टियमकडून डीआरटीने पीएमएलए तरतुदींतर्गत जप्त यूबीएलच्या ५,८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त शेअर्सची विक्री केली. ईडीने मल्ल्याची मालमत्ता जप्त केली होती. यूबीएलचे ६,६०० कोटींचे शेअर्स कन्सोर्टियमला सोपवले होते. मल्ल्या, नीरव मोदी व मेहुल चोकसीच्या गैरकारभारामुळे सरकारी बँकांचे २२,५८५.८३ कोटींचे नुकसान झाले होते.

आजवर या प्रकरणांत १८,१७० कोटींची मालमत्ता जप्त झाली आहे. ती एकूण नुकसानीच्या सुमारे ८० टक्क्यांपर्यंत आहे. आतापर्यंत सुमारे ९,०४१.५ कोटींची मालमत्ता बँकांकडे सोपवण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...