आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mamata Banerjee Akhilesh Yadav Alliance Update; Bjp Vs Congress | Naveen Patnaik | Mamata Akhilesh

तिसऱ्या आघाडीचे वारे:ममता-अखिलेश यांचा नवा मोर्चा, त्यात BJP-काँग्रेसला स्थान नाही; नवीन पटनायकही सहभागी होण्याची शक्यता

कोलकाता9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
सप अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. - Divya Marathi
सप अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व समाजवादी पक्षाचे सुप्रीमो अखिलेश यादव यांनी भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांपासून अंतर राखण्याचा निर्णय घेतला आहे. अखिलेश यादव यांनी शुक्रवारी या प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींची भेट घेतली. त्यानंतर अखिलेश यांनी भगव्या गटाला पराभूत करण्यासाठी सप ठामपणे ममतांच्या पाठीमागे उभी राहील असे स्पष्ट केले.

दुसरीकडे, ममता बॅनर्जी या प्रकरणी 23 मार्च रोजी ओडिशाचे मुख्यमंत्री तथा बीजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनायक यांचीही भेट घेणार आहेत.

ममतांची भेट घेतल्यानंतर मीडियाशी बोलताना अखिलेश म्हणाले - बंगालमध्ये आम्ही ममता दीदींसोबत आहोत. आम्हाला भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांपासून समान अंतर राखायचे आहे. ते म्हणाले की, 'भाजपची लस' घेणाऱ्यांना सीबीआय, ईडी किंवा आयटीने काहीही फरक पडत नाही. संविधानाच्या संरक्षणासाठी समाजवादी पक्ष कोणताही त्याग करण्यास तयार आहे. आपल्याला उत्तर प्रदेशात भाजपला पराभूत करता आले, तर संपूर्ण देशात भाजपचा पराभव होऊ शकतो.

अखिलेश यादवांनी शुक्रवारी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
अखिलेश यादवांनी शुक्रवारी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

अखिलेश यांनी यापूर्वीही केली ममतांची प्रशंसा

यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजपवर देशाची संपत्ती विकल्याचा आरोप केला आहे. यापूर्वी एका कार्यक्रमात बोलताना अखिलेश यांनी 2021 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव केल्याबद्दल ममतांचे कौतुक केले होते.

दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंडोपाध्याय यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले भाजप राहुल गांधींच्या परदेशातील एका विधानावर संसदेत गदारोळ करत आहे. राहुल गांधी माफी मागत नाहीत, तोपर्यंत भाजप संसदेचे कामकाज चालू देणार नाही. यावरून भाजप काँग्रेसचा वापर करून संसदेचे कामकाज होऊ देणार नसल्याचे स्पष्ट होते. राहुल गांधी विरोधकांचा चेहरा व्हावेत, अशी भाजपची इच्छा आहे. असे झाले तर ते भाजपसाठी फायद्याचे ठरेल.

TMC खासदार म्हणाले - काँग्रेस विरोधकांचा बिग बॉस नाही

तृणमूल खासदार म्हणाले की, मुळात काँग्रेस हा विरोधकांचा 'बिग बॉस' आहे, हा विचारच चुकीचा आहे. ममता बॅनर्जी 23 मार्च रोजी नवीन पटनायक यांची भेट घेणार आहेत. भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांपासून अंतर राखण्यासाठी आम्ही इतर विरोधी पक्षांशीही चर्चा करू. ही तिसरी आघाडी असल्याचा दावा आम्ही करत नाही. भाजपचा सामना करण्याची ताकद केवळ प्रादेशिक पक्षांमध्ये आहे असे आमचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...