आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mamata Banerjee Corrects Modi At Inauguration Event, Says 'We Already Inaugurated It' | Marathi News |

मोदींपुढे पुन्हा दीदीगिरी:मोदी उद्घाटन करत होते; ममता म्हणाल्या, ‘ ते तर आम्ही आधीच केले आहे’

दिल्ली/कोलकाताएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कोलकात्यात चित्तरंजन राष्ट्रीय कॅन्सर संस्थेच्या दुसऱ्या परिसराचे व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन केले. व्हीसीद्वारे झालेल्या कार्यक्रमात प. बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया हजर होते. कोलकात्याहून व्हीसीने कनेक्ट झालेल्या ममता म्हणाल्या,‘केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी मला २ वेळा फोन केला. त्यामुळे पंतप्रधानांनी स्वत: कोलकात्याच्या रुग्णालयात स्वारस्य दाखवले असे मला वाटले.

मी त्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छिते की, या रुग्णालयाचे उद्घाटन आम्ही यापूर्वीच केले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान स्थिती बिघडल्यानंतर आम्हाला कोविड सेंटर्सची गरज होती. त्या वेळी चित्तरंजन रुग्णालय राज्याशी संबंधित आहे हे कळले. त्यामुळे आम्ही त्याला कोरोना सेंटर केले होते. त्यामुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईत खूप मदत झाली.’

ममतांनी आधीही घेतला होता पंगा : मे २०२१ मध्ये पंतप्रधान मोदी यास चक्रीवादळाच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बंगालमध्ये गेले. बैठकीत ममता उशिरा आल्या, कागदपत्रे मोदींसमोर अधिकाऱ्यांना दिली आणि दुसरी मीटिंग असल्याचे सांगत निघून गेल्या.

बातम्या आणखी आहेत...